Fishing Business in Goa: हंगाम सुरु, मात्र गोवेकरांना अजून काही दिवस करावी लागणार मासळीची प्रतीक्षा

झारखंडमध्ये कामगार अडकले : केवळ 30-40 टक्केच बोटी समुद्रात
Goa Fishing
Goa FishingDainik Gomantak

Fishing Business in Goa: मासेमारीसाठी समुद्रातील खराब वातावरण कारणीभूत असले तरी बोटीवर काम करणारे कामगार सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. यंदा झारखंडमध्ये पाऊस उशिरा झाल्याने तेथील खरिपाचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे.

त्यामुळे गोव्याच्या मासेमारी बोटींवर काम करणारे कामगार अद्यापही राज्यात दाखल झालेले नाहीत. त्यामुळे मासेमारी व्यवसाय सुरू झालेला नाही, अशी माहिती मच्छीमार मंत्री नीलकंठ ह्रळणकर यांनी दिली आहे.

गोमंतकच्या अन्न संस्कृतीमध्ये माशांना विशेष महत्त्व आहे. दैनंदिन आहारात समुद्र अन्न (सी फूड) वा माशांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण खवळलेला समुद्र, खराब वातावरण आणि अद्यापही बोटींवर काम करणारे कामगार परतले नसल्याने यंदाचा हंगाम सुरू झालेला नाही.

त्याबाबत मंत्री हरळणकर म्हणाले ३१ जुलै रोजी पश्चिम किनारपट्टीवरील ६१ दिवसांची मासेमारी बंदी उठवण्यात आली आहे. हा काळ माशांच्या अंडी घालण्याचा असल्याने बंदी पाळली जाते. यंदा या बंदीचे काटेकोरपणे पालन केले आहे.

Goa Fishing
Goa Drunk and Drive Accident: जीवाचा गोवा करण्याचा नाद भोवला! दिल्ली पर्यटकांच्या 'रेंट अ कॅब'ची दुसऱ्या कारला धडक

आता मासेमारी बंदी उठवली असली तरी कामगार परतले नसल्याने सर्व बोटी समुद्रात जाऊ शकल्या नाहीत. कुटबन, वास्को, कोलवा, वार्का येथील काही बोटी (मोठे ट्रॉलर) समुद्रात गेले आहेत.

छोटे आणि पारंपरिक मच्छीमार मासेमारी करत आहेत मात्र मालिम, अंजुना येथील बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या नाहीत.

मात्र जसजसे हे कामगार परत कामावर रुजू होतील तसतसे बोटी मालक आपल्या बोटी समुद्रात उतरवतील. ऑगस्टच्या शेवटपर्यंत हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे, असेही मंत्री म्हणाले.

Goa Fishing
Goa Traffic Police: वाहतूक पोलिस ॲक्शन मोडमध्ये, मडगावात धडक कारवाई

अधिक मास आणि श्रावण

हिंदू कॅलेंडर प्रमाणे श्रावण पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून मच्छीमारबांधव आपल्या बोटी मासेमारीसाठी समुद्रात उतरवतात.

यंदा अधिक मास आल्याने श्रावण मास तब्बल एक महिना पुढे गेला आहे. या वर्षी ३० ऑगस्टला नारळी पौर्णिमा येते. त्यामुळे त्या दिवशी बोटी समुद्रात उतरवल्या जातील अशी अपेक्षा आहे.

सर्वाधिक कामगार झारखंडचे

गोव्यातील मच्छीमार बोटीवर काम करणारे सर्वाधिक कामगार झारखंड राज्यातील आहेत. झारखंडमधील एकेक गावे एका एका जेटीवर काम करते.

झारखंडमध्ये यंदा उशिरा पाऊस सुरू झाला त्याचा परिणाम खरिपाच्या हंगामावर झाला. त्यामुळे हे कामगार अद्यापही परत आलेले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com