Vishwajit Rane: तुमचे दिल्लीचे दौरे सुरू असतात, तेथे पक्षाच्या मोठ्या नेत्यांना तुम्ही भेटता, आपण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आहात. मुख्यमंत्री बनण्याची मनीषा कायम आहे, अशी विचारणा संपादक-संचालक राजू नायक यांनी अधूनमधून करीत विश्वजीत राणे यांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून त्यांनी ‘आपण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नाही, तर या काल्पनिक चर्चेवर बोलून काही फायदा नाही’, अशी गुगली टाकली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची शुक्रवारी ‘गोमन्तक टीव्ही’वर ‘एडिटर टेक’ या कार्यक्रमात मुलाखत घेतल्यानंतर शनिवारी विश्वजीत राणे हे या मुलाखतीत काहीतरी बोलून कात्रीत सापडतील, यासाठी त्यांच्यावर संपादक-संचालक ‘मुख्यमंत्री’ विषयावर सतत फिरकी घेत राहिले, परंतु राणे हे मुरब्बी राजकारणी.
घरातूनच राजकारणाचे धडे मिळाल्याने आता ते राजकारणात परिपक्व झाल्यासारखे दिसतात. काही बोललो तर त्यातून वेगळाच अर्थबोध व्हायचा याची जाणीव त्यांना बरीच आली.
अगदी सुरवातीलाच संपादक-संचालकांनी त्यांना तुम्ही मुख्यमंत्रिपदासाठी राहिला आहात, असे विधानसभेत आपणास म्हटले होते, याची आठवण सांगितली. ही चर्चा किंवा हा प्रकार म्हणजे गंभीर विषयाचा विनोद झाल्यासारखा आहे.
मुख्यमंत्रिपदाचे तुम्ही एक दावेदार आहात, तुम्ही एक डायनामिक मंत्री, तुम्ही हे स्वप्न कधी लपवून ठेवले नाही, असे विचारताच राणे म्हणतात, आपल्याकडे जी खाती दिलेली आहेत, त्या खात्याचा वापर उसगाव, पर्ये, वाळपईतील लोकांसाठी कसा करता येईल, यावर लक्ष असते. निवडणूक आल्यानंतरच राजकारणाचा विषय असतो.
दिल्लीला वारंवार होणाऱ्या दौऱ्याविषयी राणे म्हणाले, आपण स्वतः कधी दिल्लीला जात नाही, उलट वरिष्ठांकडून चर्चेसाठी बोलाविल्यानंतरच आपण जातो. कोणाला वाटले म्हणून तो दिल्लीला जाऊ शकत नाही. केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असायलाच हवे.
त्यांच्याशी संपर्कात राहणे काही वाईट गोष्ट नाही. केवळ गोव्याविषयीच चर्चा नसते, इतकी वर्षे आपण पक्षात आहोत आणि आपण नातेसंबंध जपत आहोत, त्याचा गैरफायदा कधीही घेतलेला नाही. आपल्याला कोणत्याच पदाची अपेक्षा नाही, सध्या आपल्याकडे जी खाते आहेत, त्याचा फायदा जनतेसाठी कसा होईल आणि काम खूप आहे, त्यात लक्ष घातलेले आहे.
मुख्यमंत्री सावंत यांना पाठिंबा असल्याचे आपण विधानसभेत सांगितले आहे, पुन्हापुन्हा त्या विषयावर विचारले तरी उत्तर तेच असेल. विश्वजीत हे मुख्यमंत्री होतीलच, असे राजकीय पत्रकारांना वाटते, त्यावर या काल्पनिक चर्चेवर बोलून काही फायदा नाही, असे राणे सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.