Margao Crime: विद्यार्थिनीवर बलात्‍कारप्रकरणी निवृत्त शिक्षकाविरुद्ध गुन्‍हा नोंद, दहा वर्षांपूर्वी घडलेले प्रकरण उघड

पीडित युवतीने प्रकरणाला फोडली वाचा
Margao Crime
Margao CrimeDainik gomantak
Published on
Updated on

A case has been registered against a retired teacher for raping a student

आपल्‍या स्‍वत:च्‍याच मुलीवर बलात्‍कार केल्‍याच्‍या आरोपाखाली हल्‍लीच एका नराधम बापाला दहा वर्षांची शिक्षा ठोठावल्‍याची घटना ताजी असतानाच एका शिक्षकाने अल्‍पवयीन विद्यार्थिनीवर सतत दोन वर्षे लैंगिक अत्‍याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे.

या प्रकरणी मडगाव पोलिसांनी निवृत्त शिक्षक अर्जुन गवंडे याच्‍या विरोधात बलात्‍कार आणि बाल अत्‍याचार (पोक्‍सो) कायद्याखाली गुन्‍हा नोंद केला आहे.

ही लैंगिक अत्‍याचाराची घटना 2012 ते 2014 या कालावधीत घडली होती. त्‍यावेळी गवंडे हे मडगाव येथील होली स्पिरीट हायस्‍कूलमध्‍ये हिंदी शिक्षक म्‍हणून काम करत होते.

हिंदी विषयात कमकुवत असलेल्‍या त्‍या विद्यार्थिनीला तिच्‍या घरी शिकवणी देण्‍यासाठी जात असताना त्‍याने हा अत्‍याचार केला, असे त्‍या विद्यार्थिनीने आपल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे.

Margao Crime
Goa Crime News : सात वर्षांच्या अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, गवंडे शिकवणी देण्‍यासाठी येत असताना ती विद्यार्थिनी घरात एकटीच असायची. याचाच फायदा उठवून त्‍याने तिच्‍यावर सतत दोन वर्षे बळजबरी चालवली होती.

त्‍यावेळी ही विद्यार्थिनी फक्‍त १४ वर्षांची होती. त्‍यावेळी आपण तक्रार केली, तर आपले म्‍हणणे कोणी मानणार नाही या भीतीने आपण या प्रकाराची वाच्‍यता केली नव्हती.

मात्र, आता त्‍यावेळी झालेला हा प्रकार आपल्‍याला सहन होत नाही. त्‍यामुळेच आपण ही तक्रार करत असल्‍याचे या विद्यार्थिनीने तक्रारीत म्‍हटले आहे. सध्‍या तिचे वय २४ वर्षे आहे.

Margao Crime
Vasco Crime: झुंडशाहीचे प्रत्यंतर; फा. बोलमॅक्स परेरांच्या आक्षेपार्ह वक्‍तव्‍यामुळे जमाव आक्रमक

मडगावात खळबळ

या घटनेने मडगाव हादरून गेले असून दहा वर्षांपूर्वी झालेल्‍या या प्रकाराबद्दल लोकांनी चीड व्‍यक्‍त केली आहे. हा शिक्षक राजकीय पार्श्वभूमी असलेला असल्‍याने या प्रकरणी तक्रार नोंद केली जाऊ नये यासाठी काही राजकारण्‍यांनी दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचे समजते.

मात्र, ती मुलगी आपल्‍या म्‍हणण्यावर ठाम राहिल्‍याने शेवटी या प्रकरणी काल शुक्रवारी उशिरा मडगाव पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Margao Crime
Cacora Garbage Treatment Plant: 100 टन प्रक्रियेची क्षमता असूनही कचरा नेला जातोय साळगावला, दिवसाला केवळ 15 टन कचऱ्यावर प्रक्रिया

वास्तविक लोकलज्‍जेस्‍तव पीडित मुली अशाप्रकरणी तक्रार करायला पुढे येत नाहीत. मात्र, दहा वर्षानंतर का होईना पण या मुलीने तक्रार करण्‍याची हिंमत दाखवली. त्‍यामुळे तिला दाद द्यावी लागेल. आपल्‍यावर होणाऱ्या अन्‍यायाला वाचा फोडण्‍यासाठी इतर मुलींनीही असेच धाडस दाखविण्‍याची गरज आहे.

- आवडा व्‍हिएगस, महिला हक्‍क चळवळीतील ज्‍येष्‍ठ कार्यकर्त्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com