Aldona MRF Shed: माझ्याविरोधात तक्रार करण्यासाठीच रामतळे ग्रामस्थांचा वापर - कार्लुस फेरेरा

Aldona MRF Shed: मांद्रेकर यांनी सूड माझ्यावर उगवला आहे.
Carlos Ferreira
Carlos FerreiraDainik Gomantak
Published on
Updated on

Aldona MRF Shed: रामतळे येथील काही ग्रामस्थांची दिशाभूल करून आपल्याविरोधात बेकायदा बांधकामाची तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोप हळदोण्याचे आमदार अॅड. कार्लुस आल्वरिस फरेरा यांनी केला आहे.

रामतळे, हळदोणा येथील काही ग्रामस्थांनी स्थानिक पंचायतीकडे केलेल्या तक्रारीला उत्तर देताना ते बोलत होते.

हळदोणा येथील कुशें, खोर्जुवे येथील फरेरा यांचे घर (सर्व्हे क्रमांक 156/1) रुपांतर सनद, पंचायत बांधकाम परवाना, टीसीपी आणि आरोग्य विभागाची परवानगी न घेता बांधण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गोवा इमारत कायद्यानुसार सार्वजनिक रस्ता अडवून मर्यादेपेक्षा जास्त बेकायदा कंपाऊंड वॉल बांधण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रामतळे ग्रामस्थांचा गैरवापर करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हळदोण्याचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांचे माजी स्वीय सचिव असलेल्या अमर मांद्रेकर या व्यक्तीकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

पोंबुर्पा प्रकरणात मी बेकायदेशीरपणाच्या विरोधात गावकऱ्यांना पाठिंबा दिला आणि मी काम थांबवण्याची खात्री केली. मांद्रेकर हे या प्रकल्पाचे कंत्राटदार असल्याचे मला नंतर कळले. त्यामुळे त्यांनी याचा सूड माझ्यावर उगवला आहे,' असे फरेरा यांनी सांगितले.

एमआरएफ शेडच्या मुद्द्यावरून रामतळे येथील प्रभागातील स्थानिक नाराज असल्याचेही फरेरा यांनी सांगितले. हे प्रकरण पंचायत आणि उच्च न्यायालय यांच्यातील असल्याने मी याबाबत बोललो नाही.

एमआरएफ शेड उभारण्यासाठी मी माझी जमीन पंचायतीला दिली होती. पंचायतीने कोमुनिदादकडे जमिनीची मागणी केली होती, ती देण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मोठी बैठक झाली आणि मांद्रेकर यांनी माझे घर बेकायदा बांधले असल्याचा दावा करणारे व्हिडिओ प्रेझेंटेशन केले.

आता तो पडद्यामागे लपला असून गावकऱ्यांना तक्रार दाखल करण्यास भाग पाडले आहे. ग्रामस्थांना माझा काहीही विरोध नाही, असे आमदारांनी स्पष्ट केले.

फरेरा यांनी सांगितले की, त्यांचे घर आणि संरक्षक भिंत सर्व परवानग्या घेऊन १० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. पंचायतीने मला नोटीस बजावली तर मी या आरोपांचे खंडन करून उत्तर देईन आणि काहीही बेकायदेशीर केले नसल्याचे सिद्ध करेन, असे ते म्हणाले.

खोर्जुवेमध्ये राहणाऱ्या भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या घराच्या आणि संरक्षक भिंतीच्या कागदपत्रांसाठी माहिती हक्क कायद्यांतर्गत अर्ज केला होता आणि सर्व कागदपत्रे मिळवली होती, असेही फरेरा यांनी सांगितले.

आपण रामतळे ग्रामस्थांच्या चळवळीचा भाग आहोत आणि जर ते स्थानिकांकडून ही वस्तुस्थिती दडवत असतील तर ही तक्रार दाखल करणाऱ्या या लोकांबद्दल मला वाईट वाटते. मी प्रत्यक्षात त्यांच्यावर कारवाई करू शकतो परंतु मी सूड घेत नाही.

मांद्रेकर ग्रामस्थांची दिशाभूल करत असून, त्यांना सध्या भेडसावत असलेला तणाव गावात निर्माण झाला आहे. ज्याची अंतिम जबाबदारी मांद्रेकरांवर असेल, असे फरेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com