Goa Road News: आधी रस्ते खड्डेमुक्त करा, मगच तिसऱ्या विमानतळाचे स्वप्न पाहा

Goa Road News: युरींचा माविनना सल्ला : रस्त्यांच्या देखभालीकडे सरकारचे दुर्लक्ष
Yuri Alemao | Mauvin Godinho
Yuri Alemao | Mauvin GodinhoDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Road News: गेल्या विधानसभा अधिवेशनात मी भूत एअरपोर्टबाबत बोललो होतो. मोपा विमानतळावरून अजून एकही विमान उडालेले नसताना वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हे गोव्यातील तिसऱ्या विमानतळाची स्वप्ने पाहात आहेत.

गोव्याच्या रस्त्यांवर आधीच अवतरलेल्या खराब रस्त्याच्या जीवघेण्या भूताला मारल्यानंतरच त्यांनी तिसऱ्या विमानतळाचा शोध घ्यावा असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लगावला आहे.

गोव्यात दररोज जीवघेण्या अपघातांत निष्पाप लोकांचा जीव जात आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था, रस्ते वाहतूक विभागातील भ्रष्टाचार हे या अपघातांचे प्रमुख कारण आहे.

रस्त्यांची देखभाल करणे आणि वाहनांची योग्यता तपासणे यावर कोणाचेच नियंत्रण नाही, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी गोव्याच्या रस्त्यांवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. जीवघेणे अपघात थांबावेत यासाठी त्यांनी पावले उचलण्याची गरज आहे. भाजप सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि उदासीनतेमुळे आज अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होत आहेत, असे युरी आलेमाव म्हणाले.

Yuri Alemao | Mauvin Godinho
Dangerous Road in Goa : उसगावचा चौपदरी पूल अंधारात; अपघाताचा धोका वाढला

रस्ते बनले ‘किलर झोन’

गोव्यातील रस्ते पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकारने सक्रिय पावले उचलली पाहिजेत. पत्रादेवी ते म्हापसा आणि वेर्णा महामार्ग तसेच मोले - फोंडा रस्ता आता ‘किलर झोन’मध्ये बदलला आहे. वाहनांच्या हालचालींवर रस्ते वाहतूक विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

‘जेटी’च्या धर्तीवर ‘विमानतळ धोरण’?

पर्यटकांची संख्या अनेक पटींनी वाढणार असल्याने तिसऱ्या विमानतळाची गरज असल्याचा साक्षात्कार झालेले वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो आता वादग्रस्त ‘जेटी धोरणा’च्या धर्तीवर ‘विमानतळ धोरण’ आणण्यास पर्यटन मंत्र्यांस सांगणार नाहीत अशी आशा बाळगूया, असा टोमणा युरी आलेमाव यांनी मारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com