Margao News योग आणि आयुर्वेद ही ॠषीमुनींच्या काळापासून चालत आलेली मोठी परंपरा असून भारताला लाभलेली ही दैवी देणगी आहे.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनल्यानंतर योग आणि आयुर्वेद उपचाराला मोठी चालना मिळाली. त्यामुळे आज सगळे विश्वच आयुर्वेदाचा आधार घेत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
मडगावात आयुर्वेद शिबिराचा शुभारंभ केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी समई प्रज्वलित करून केला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मिरॅकल ड्रिंक, निओ आयुर्वेदचे संचालक तथा माजी आयएएस अधिकारी डॉ. एस. एम. राजू, डॉ. स्नेहा भागवत, वितरक श्याम प्रभुगावकर, शोभा प्रभुगावकर, श्रुती प्रभुगावकर यांचे कौतुक केले. त्यांनी व्यवसाय म्हणून काम न करता आपली सेवा बजावली असल्याचे ते म्हणाले.
आपल्या भाषणात डॉ. एस. एम. राजू म्हणाले की, आज आयुर्वेदाचा प्रसार होत असला, तरी त्यापुढे अनेक आव्हाने आहेत. आयुर्वेदाची अनेक प्रकारची संशोधनेही यशस्वी झाली आहेत.
भारत देश हा आयुर्वेदाचा विश्वगुरू बनल्याचे ते म्हणाले. डॉ. भागवत यांनी यावेळी आयुर्वेद उपचारांची माहिती आणि फायदे सांगितले.
शोभा प्रभुगावकर यांनी मंत्री श्रीपाद नाईक यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. सूत्रसंचालन प्रा. अनंत अग्नी यांनी केले.
स्वातंत्र्यानंतर आयुर्वेदाकडे दुर्लक्ष
भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारांनी योग आणि आयुर्वेद या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केले. आयुर्वेदाला सरकारचे पाठबळ मिळाले नाही.
मात्र, नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम योग आणि आयुर्वेद उपचारांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे आज सारा देश आणि विश्वही आयुर्वेद उपचारांकडे वळले आहे, असे श्रीपाद नाईक म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.