Goa: मडकई भाजपचे मंडळ अध्यक्ष प्रदीप शेट,ओम बिर्ला यांना भेटले

केंद्रीय पर्यटनमंत्री (Union Tourism Minister) जी. किशन रेड्डी यांचीही भेट घेतली. (Goa)
Goa: Pradip Shet met Speaker of Parliament Om Birla, on 27 July, 2021.
Goa: Pradip Shet met Speaker of Parliament Om Birla, on 27 July, 2021.Pradeep Naik / Dainik Gomantak

दाबोळी: भारतीय जनता पार्टी मडकई मंडळ अध्यक्ष प्रदीप शेट यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय संसद सभापती ओम बिर्ला (Speaker of Parliament Om Birla) तसेच केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी (Union Tourism Minister G. Kishan Reddy) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

Pradip Shet  met Union Tourism Minister G. Kishan Reddy, on 27 July, 2021.
Pradip Shet met Union Tourism Minister G. Kishan Reddy, on 27 July, 2021.Pradeep Naik / Dainik Gomantak

भारतीय जनता पार्टी मडकई मंडळ भाजपा अध्यक्ष तथा उद्योजक प्रदीप शेट यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे संसदेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली व विवीध विषयावर सविस्तर चर्चा केली. सध्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्यांनी निवडणुकी संदर्भातही ओम बिर्ला यांच्याकडे चर्चा केली. तसेच गोव्यातील त्यांच्या कार्याविषयी त्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य कार्यकारी सदस्य प्रथमेश शेट उपस्थित होते.

Goa: Pradip Shet met Speaker of Parliament Om Birla, on 27 July, 2021.
Goa Election: गोवा फॉरवर्ड काँग्रेसशी युती करणार

दरम्यान या व्यतिरिक्त त्यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जी किशन रेड्डी यांची भेट घेतली व त्यांच्या केंद्रातील कामकाजाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य कार्यकारी सदस्य प्रथमेश शेट यांनी गोव्यातील त्यांच्या कामगिरी विषयी सविस्तर माहिती दिली. सदर दिल्लीवारी आपणास फलदायी ठरली असल्याचे प्रदीप शेट यांनी वास्को येथे एका कार्यक्रमात आले असता सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com