गोवा मराठी पत्रकार संघातर्फे म्हापशात मान्यवरांचा गौरव

मराठी पत्रकार संघाने सत्कार करू या कोरोनाच्या काळात काम करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे
Goa Marathi Press Association honor to people who work in Covid  in Mapusa
Goa Marathi Press Association honor to people who work in Covid in Mapusa Dainik Gomantak

गोवा मराठी पत्रकार संघाच्या वतीने म्हापसा (Mapusa) शहरातील पत्रकार, क्रीडापटू, समाज कार्यकर्ते, इव्हेंट आयोजक अशा मान्यवर व्यक्तींचा गौरव सोहळा खोर्ली-सीम येथील राष्ट्रोळी देवस्थानाच्या सभागृहात पार पडला. (Goa Marathi Press Association honor to people who work in Covid)

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी सीताराम ऊर्फ दीपेश सावळ उपस्थित होते. विशेष अतिथी बार्देश पत्रकार संघाचे अध्यक्ष तुषार टोपले, बोडगेश्वर शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे, देवस्थानचे अध्यक्ष संजय साळगावकर व माजी सैनिक शांताराम रेडकर उपस्थित होते. पत्रकार सुदेश आर्लेकर, इव्हेंट आयोजक पंकज हिरवे, क्रीडापटू तथा गायक विनेश नाईक, समाज कार्यकर्ते राजेंद्र तेली, राष्ट्रोळी देवस्थानचे माजी अध्यक्ष निशिकांत साळगावकर यांचा शाल स्मृतिचिन्ह देऊन म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी सीताराम सावळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गुरुनाथ नाईक यांच्या हस्ते मुख्याधिकारी सीताराम सावळ यांचा सत्कार करण्यात आला.

Goa Marathi Press Association honor to people who work in Covid  in Mapusa
पणजी मार्केट असोसिएशनचा गाळ्यांवर कब्जा..!

मराठी पत्रकार संघाने आमचा सत्कार करून आम्हाला या कोरोनाच्या काळात काम करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे, संघाने मराठी चळवळीला उत्तेजन दिले आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पत्रकारांना संघटित केले आहे. भविष्यात मराठी पत्रकार संघाचे सदस्यत्व सर्व नवीन पत्रकारांना खुले करून संघाची उंची वाढवावी, असे मत सत्कारमूर्ती सुदेश आर्लेकर यांनी मांडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com