Gramsabha: म्हाऊस पंचायतीच्या ग्रामसभेत टाॅवरचा मुद्दा गाजला; पर्यटन खात्याच्या 'या' योजनेबाबतची चर्चाही रंगली

Gramsabha: ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
Gramsabha
GramsabhaDainik Gomantak
Published on
Updated on

Gramsabha: रविवारी म्हाऊस पंचायतीची विशेष ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

त्यात प्रामुख्याने गावात सुरु असलेली विविध विकास कामे, ग्रामस्थांनी विरोध केलेल्या मोबाईल टाॅवर तसेच पर्यटक खात्यातर्फे रोजगार करण्यासाठी वाहन खरेदीसाठी खास आयोजीत केलेल्या योजनेविषयी चर्चा करण्यात आली.

म्हाऊस गावात प्रभाग 5 मध्ये गेल्या काही दिवसांपासून खासगी मालमत्तेत मोबाईलच्या टॉवर चा विषय गाजत आहे. या टाॅवरसाठी ग्रामस्थांनी विरोध दर्शवून टाॅवरचे काम बंद पाडले होते. तसेच ग्रामस्थांनी पंचायतीला टाॅवरविरोधात अर्ज सुध्दा केलेला होता.

Gramsabha
Morjim News: चालत्या कदंब बसखाली मजुराने केली आत्महत्या; अधिक तपास सुरू

मात्र विरोध करुन सुध्दा टाॅवरची हालचाली पुन्हा सुरु होण्याची शक्यता ग्रामस्थांनी दर्शविली त्यामुळे आजच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी टाॅवरचा विषय प्रश्न उपस्थित करुन टाॅवरला साफ विरोध केला. तसेच गावात जर यापुढे कोणत्याही कंपनीचा टॉवर उभारला जाईल तर त्यात कोणाच्या ही मालमत्तेत तो न येता देवस्थानच्या हक्काच्या जागेत टॉवर उभारावा.

जेणेकरून देवस्थानला आर्थिक फायदा होऊन पाठबळ प्राप्त होईल. जर देवस्थानच्या मालमत्तेत टाॅवर आला तर ग्रामस्थांना याचा विरोध नसणार आहे.

मात्र जर तो खाजगी जमिनीत टाॅवर आला तर यासाठी आमचा कायम विरोध असेल अश्या प्रकारचा ठराव ग्रामस्थ अनिल गावकर यांनी ग्रामसभेत ठराव मांडला. यावर ग्रामस्थांनी सहमती देऊन ग्रामसभेत हा ठराव सहमत करण्यात आला.

Gramsabha
Bicholim Fire Case: डिचोलीत फ्लॅटला आग, लाखोंची हानी; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

म्हाऊस गावात रस्त्याच्या बाजुला संरक्षण भिंत, गटाराचे काम तसेच रस्त्याचे ही काम सुरु आहे. जी विकास कामे सुरु आहे त्याची पंचायतीने तपासणी करुन सर्व कामे सुरळीत करावी असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.

तसेच कोणकोणती कामे कशी होणार आहे ती लवकरत लवकर करावी असे ही काही नागिराकंनी सांगितले. यावर सरपंच सोमनाथ काळे यांनी आपण याकडे जातीने लक्ष घालुन सर्व कामे लवकरत लवकर व सुरळीत करुन घेणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी पर्यटक खात्यातर्फे भाडे मारण्यासाठी खास वाहनावर असलेली योजनांची माहिती खात्याकडून आलेल्या मणेरकर यांनी ग्रामसभेत दिली. या खास योजना आखून सवलतीच्या दरात वाहन उपलब्ध केले जाते.

या वाहनाव्दारे आपला व्यवसाय धंदा करुन काही प्रमाणात आर्थिक दृष्ट्या सक्षम रहाण्यासाठी व स्वयंपुर्ण रहाण्यासाठी ही खास योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी या योजनेचा फायदा करुन व्यवसाय करण्यासाठी वाहन खरेदी करावे असे सांगण्यात आले. तसेच सवगतीचे पत्र सुध्दा उपस्थितांना वितरीत करण्यात आले.

सुलभा देसाई यांनी गोमन्तकच्या पत्रकार सपना सामंत यांना गोमंतक मराठी अकादमीतर्फे मराठी दिना निमित्त सत्कार केल्याबद्दल अभिनंदाचा ठराव मांडला. यावेळी सर्वांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले.

म्हाऊस पंचायतीचे बांधकाम पुर्णत्वाचे आल्याने त्याचे उद्घाटन लवकर व्हावी अशी ही मागणी काही जणांनी केली.

यावेळी संपन्न झालेल्या ग्रामसभेत जास्त विषय न आल्याने सर्व विषयावर सविस्तर चर्चा करुन ग्रामसभा समाप्त करण्यात आली.

यावेळी ग्रामसभेत सरपंच सोमनाथ काळे, उपसरपंचा राधिकी सावंत, सचिव संदीप हल्याळी, पंच सुलभा देसाई, प्रिती गावकर, गुरुदास गावस, कांता गावस, सयाजी सावंत व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

स्वागत व प्रास्ताविक तसेच मागील सभेची माहिती सचिव संदीप हल्याळी यांनी वाचून कायम केली. सरपंच सोमनाथ काळे यांनी स्वागत केले तर पंच सुलभा देसाई यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com