Goa BJP: दक्षिण गोव्यात भाजपाची जोरदार तयारी; केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखरांनी दिला कार्यकर्त्यांना 'हा' मंत्र

Goa BJP: सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा- चंद्रशेखर
BJP
BJP Dainik Gomantak

Goa BJP: लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून, दक्षिण गोव्‍यातील जागा मिळवण्‍याचा चंग बांधला आहे.

त्‍यासाठी संघटनात्‍मक पातळीवर कामकाजाचा ‘गिअर’ बदला असून, आज सांगे व केपे तालुक्‍यात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी कार्यकर्त्यांच्‍या भेटी घेऊन कानमंत्र दिला.

उगे पंचायत सभागृहात नगरपालिका आणि पंचायत लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना ते म्‍हणाले, ''मोदी सरकार सत्तेवर येण्याआधी केंद्र सरकारची आर्थिक स्थिती कशी होती ते आपण जाणता. सर्व संकटांना तोंड देत दहा वर्षांच्या कालावधीत देशाने अधिक प्रगती साधली आहे.

BJP
Panjim Smart City: पर्रीकरांचा घाव, महापाैरांची धाव! टिकेनंतर दुसऱ्याच दिवशी महापौर कामाच्या ठिकाणी दाखल

पुढील काळातही केंद्रात मोदी सरकार येईल, यात शंका नाही. त्‍यासाठी दक्षिण गोव्‍यातून आपलेही योगदान असावे. म्‍हणूनच सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा,'' असे त्‍यांनी आवाहन केले.

यावेळी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, दामू नाईक, तुळशीदास नाईक, सरपंच भारती नाईक, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, मंडळ अध्यक्ष बायो भंडारी, सचिव राजेश गावकर उपस्‍थित होते. राजेश गावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सुरेश केपेकर यांनी आभार मानले.

मोदींमुळे अनेक प्रश्‍‍न मार्गी

पंतप्रधान मोदी यांच्‍यामुळे अनेक प्रश्‍‍न सुटले असून, कोरोना महामारीवर मात केली. राममंदिर बांधले. प्रत्‍येक खेड्यात हर घर जल, गॅस, सुलभ सौचालय सुविधा पुरविल्‍या. आगामी काळात केंद्र सरकार गरीब, युवा, किसान आणि नारी शक्ती या चार घटकांना केंद्र बिंदू मानून काम करणार आहे, असे चंद्रशेखर म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com