Panjim Smart City: पर्रीकरांचा घाव, महापाैरांची धाव! टिकेनंतर दुसऱ्याच दिवशी महापौर कामाच्या ठिकाणी दाखल

Panjim Smart City: 10 रोजी खास बैठक, मुख्‍यमंत्र्यांची ग्‍वाही
Panjim Smart City
Panjim Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Smart City: पणजीत स्मार्ट सिटीची सुरू असलेल्या कामांमुळे कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघाती युवकाचा झालेल्या मृत्यूनंतर उत्पल पर्रीकर यांनी महापौरांवर निशाणा साधला होता.

त्याशिवाय महानगरपालिकेच्या कामाविषयी विविध पक्षांनीही संशय व्यक्त केल्याने अखेर अपघातानंतर चार दिवसांनी महापौर रोहित मोन्सेरात आणि उपमहापौर संजीव देसाई काही अधिकाऱ्यांचा लवाजमा घेऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यास रस्त्यावर उतरले.

तसेच मुख्‍यमंत्र्यांनी याच विषयावर 10 रोजी बैठक घेणार असल्‍याचे जाहीर केले आहे.
खरेतर सोमवारी पहाटे अपघात झाल्यानंतर त्याच दिवशी महापौर-उपमहापौरांनी घटनास्थळावरील उपाययोजनांची पाहणी करणे अपेक्षीत होते.

परंतु तसे काही झालेले नाही. अपघाताच्या तीन दिवसांनी उत्पल पर्रीकर यांनी महापौरांविरोधात अविश्‍वास ठराव आणावा, असे आवाहन सर्व नगरसेवकांना केले होते. त्याशिवाय पणजीच्या आमदार बाबूश मोन्सेरात यांचे नाव न घेता पणजीचा ‘कारभारी‘ बदला असे आवाहनही त्यांनी केले.

पर्रीकर यांनी केलेल्या टीकेचा घाव चांगलाच महापौर-उपमहापौरांच्या वर्मी लागलेला दिसून आल्यानेच सकाळी महानगरपालिकेचे अधिकारी, वाहतूक पोलिस व स्मार्ट सिटीच्या कामाचे अभियंत्यांसमवेत शहरातील कामांची पाहणी केली.

कामाचा आढावा घेत त्यांनी कंत्राटदारांना दोन दिवसांत कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Panjim Smart City
गोवा ट्रिपवरून परतताना अपघात; उड्डाणपुलावरून खाली कोसळली कार

राजधानीत स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत गेल्यावर्षापासून रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच मलनिस्सारण वाहिन्यांची कामे सुरू आहेत. जी-20 बैठकांमुळे थांबवण्यात आलेली कामे पावसाळा संपताच कंत्राटदाराने सुरू केली.

शहरात एकाचवेळी मलनिस्सारण भूमिगत वाहिनी टाकण्याचे व त्यासाठीच्या चेंबरचे काम सुरू झाले. परंतु, ही कामे सुरू करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार कंत्राटदाराने नगरसेवकांना अजिबात विश्वासात घेतले नसल्याने अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

मलनिस्सारणाचे चेंबरचे मळ्यात पिपल्स हायस्कूलजवळ सुरू असलेल्या कामाजवळ बॅरिगेटस् लावले असले तरी त्याठिकाणी अंधार होता. त्या अंधारामुळेच १ जानेवारीच्या पहाटे रायबंदर येथील आयुष हळर्णकर याची दुचाकी थेट चेंबरच्या खड्ड्यात गेली आणि त्यात खड्ड्याच्या विरुद्ध दिसेला ठेवलेल्या काँक्रिट मिक्सरवर आयुषचे डोके आदळले, जागीच आयुषचा मृत्यू झाला.

Panjim Smart City
Vishwajit Rane: वृक्षतोड शुल्काबाबत आमदार व्हिएगस यांनी वनमंत्र्यांची भेट घेत सादर केलंय 'हे' निवेदन

त्यामुळे खड्ड्यांच्या कामाच्या ठिकाणी आवश्‍यक उपाययोजना केल्या नसल्याचे निदर्शनास आले. याठिकाणी महापौर-उपमहापौर, पणजी आमदार, इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी धावला नाही, उलट विरोधी आमदार, नगरसेवक व इतर राजकीय पक्षांनी घटनास्थळी धाव घेत सरकार आणि कंत्राटारांवर टीका केली होती. उत्लप यांनी अपघातानंतर तीन दिवसांनी टीका केली होती. '

आपकडून पोलिसांत तक्रार:-

राज्य सरकारने येत्या 10 जानेवारी रोजी स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

या बैठकीला पणजी महानगरपालिका महापौर, स्मार्ट सिटीचे अधिकारी इत्यादींसह सर्व भागधारक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. काँग्रेस पक्षाने स्मार्ट सिटीच्या कामाचे ऑडिट करण्याची मागणी केली होती.

आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्मार्ट सिटीच्या कामांविषयी जो पुढकार घेतल आहे, त्यावरून विरोधी पक्षांच्या मागणी केली होती.

काहींनी पिडित हळर्णकर कुटुंबांना मदत देण्याची मागणी माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईक व इतर काही पक्षांनी केली आहे. तसेच आपने पोलिसांत तक्रार केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com