Goa News: फोंड्यात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश! एका तरुणीची सुटका, तिघांना अटक; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Latest News Today 31 August 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Goa News:  फोंड्यात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश! एका तरुणीची सुटका, तिघांना अटक; वाचा दिवसभरातील घडामोडी
Bank Robbery Dainik Gomantak
Published on
Updated on

भुईपाल सत्तरी येथे यंदाही पर्यावरण पूरक गणेश मूर्ती

भुईपाल सत्तरी येथील सुर्यकांत गावकर यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही पर्यावरण पूरक गणेश मूर्ती केली आहे.

मांद्रे येथे इको फ्रेन्डली अनंत लीला भक्ती आश्रम देखावा

मराठवाडा, मांद्रे येथील साजों अनंत पार्सेकर यांच्या निवासस्थानी इको फ्रेन्डली अनंत लीला भक्ती आश्रम देखावा करण्यात आलाय

किरणपाणी पालये येथे गरिबाला श्रीमंत करणारा गणपती देखावा

किरणपाणी पालये येथील विठ्ठल सावळ यांच्या निवासस्थानी गरिबाच्या झोपडीत गणपति विराजमान होतात आणि गरिबाला श्रीमंत करतात असा देखावा करण्यात आला

सत्तरीत हौशेत्सव संपन्न 

कोपर्डे सत्तरी येथे मोठ्या संख्येने महिलांनी पारंपारीक पद्धतीने गौरी पूजन करत रायच्या तळीचे पाणी घरी आणले. सत्तरी पाच दिवस अनेक ठिकाणी गौरी पूजन केले जाते आता दुपारी हौशेत्सव संपन्न होणार.

म्हापसा येथील वामन सदन इमारतीतील सेलटाऊन रबर स्टॅम्प दुकानात चोरी

म्हापसा येथील वामन सदन इमारतीतील सेलटाऊन रबर स्टॅम्प दुकानात एका अज्ञात चोराने घुसून फ्लॅश मशीन, लॅमिनेशन मशीन आणि इतर वस्तूंसह २ लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेले.

बागाईत वाडा पालये येथे तुकाराम चालले वैंकुठला आकर्षित देखावा

शिवम संजय गडेकर बागाईत वाडा पालये येथे तुकाराम चालले वैंकुठला आकर्षित देखावा करण्यात आला. सात दिवस देखावा गणेशभक्तांसाठी खुला.

अभिनेत्री प्रिया मराठे यांचं दुःखद निधन

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रिया मराठे यांचं आज निधन झालं. त्यांचं कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन झालं आहे.

फोंड्यात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; एका तरुणीची सुटका, तिघांना अटक

गोव्यात मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. फोंडा पोलिसांनी शुक्रवारी रात्री एका मोठ्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत, एका पीडित तरुणीची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

सत्तरीत विविध भागात पाच दिवसीय गौरी उत्सवाला सुरुवात

सत्तरीत विविध भागात पाच दिवसीय गौरी उत्सवाला सुरुवात, पारंपरिक पद्धतीने नदीचे पाणी आणून सुहासिनी महिलांतर्फे विधिवत पूजा करताना वेळुस वाळपई येथील महिला वर्ग. उत्सवात पाऊसाची हजेरी

Rivona Death: सख्ख्या भावांचा मृत्यू, आरोपी स्त्रीला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

केपेन्यायालयाने रिवण येथे दोन बंधूंच्या विद्युतप्रवाहामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी आरोपी स्त्रीला १३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सूत्रांनुसार, आरोपीने आपल्या मालमत्तेभोवती विद्युतक्षेत्राचे कुंपण बसवले होते, ज्यामुळे पीडितांना विद्युतशॉक बसला.

जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com