Goa News: "मी रामा काणकोणकरांच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे', मंत्री राणेंचं वक्तव्य; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर घडामोडी.
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

"फर्मागुडीचा जागेचा विचार सरकारने करावा" माजी खासदार विनय तेंडुलकर

आयआयटीसाठी योग्य जागा सापडली नसल्यास वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विनंती केलेल्या फर्मागुडीचा जागेचा विचार सरकारने करावा - माजी खासदार विनय तेंडुलकर

"तवडकराक सांगिल्ले...." - विजय सरदेसाई; Watch Video

"मी रामा यांच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे" मंत्री राणे

रामा कांकोणकर यांच्यावर जीएमसीमध्ये उपचार सुरू आहेत आणि मी त्यांचे बारकाईने निरीक्षण करत आहे. त्यांच्या डिस्चार्जबाबत काही गोंधळ होता, परंतु मी डॉक्टरांना कळवले की सरकार त्यांना आवश्यक असलेले सर्व उपचार देण्यास वचनबद्ध आहे. मी वैद्यकीय अधीक्षकांना त्यांची पूर्ण काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत

Ponda Crime: फोंड्यात वडिलांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

फोंडा येथे पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका नराधम पित्याने आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी वडिलाला अटक केली आहे.

"माझ्याकडे असंख्य पुस्तके आहेत त्यामुळे मी अचूक पाने मोजू शकत नाही" गोविंद गावडे

माझ्याकडे असंख्य पुस्तके आहेत त्यामुळे मी अचूक पाने मोजू शकत नाही. मी एक उत्सुक वाचक आहे आणि माझ्या घरी हजारो पुस्तके आहेत. मी नक्कीच एक पुस्तक लिहीन असे गोविंद गावडे यांनी रमेश तवडकरबाबत बोलताना सांगितले.

"डॉ. गणेश गांवकर यांना विधानसभेच्या सभापतीपदी नियुक्ती, मला वाढदिवसाची भेट" विनय तेंडुलकर

सावर्डे मतदारसंघातील आमदार डॉ. गणेश गांवकर यांना विधानसभेच्या सभापतीपदी नियुक्ती म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून मला व जनतेला मिळालेली वाढदिवसाची अमुल्य अशी भेट.

- विनय तेंडुलकर

गोवा विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला सुरुवात

"हत्ती हे गणपतीचे रूप आहे तो लोकांना भेटण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आला" कृषीमंत्री

ओंकार हत्तीच्या उपस्थितीबद्दल भाष्य करताना कृषीमंत्री रवी नाईक म्हणाले की ज्या लोकांचे नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई देऊ.हत्ती हे गणपतीचे रूप आहे तो लोकांना भेटण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आला आहे

नवीन सभापतींनी तटस्थ राहावे : एलओपी

विरोधी पक्षात आमच्यापैकी ७ जण आहेत, परंतु सभापतींच्या निवडणुकीत आम्हाला १० मते मिळण्याची अपेक्षा आहे. विधानसभेत सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ जास्त असू शकते, परंतु बाहेर आम्हाला मजबूत पाठिंबा आहे. जो कोणी सभापती होईल त्याने तटस्थ राहावे आणि सर्वांशी निष्पक्ष राहावे : युरी आलेमाओ, एलओपी

सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती बाजारपेठ पेडणे मार्फत 21 वर्षापासून श्री दुर्गा पूजन

सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती बाजारपेठ पेडणे मार्फत 21 वर्षापासून श्री दुर्गा पूजन केले जाते आणि या दुर्गा पुजनामध्ये सलगपणे 21 वर्षे मूर्तिकार शांताराम बापू कोल्हापूरकर हे स्वतः चिकण माती पासून दुर्गा देवीची मूर्ती तयार कतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com