

कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास संघटितपणे प्रतिकार करणार. डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांचा इशारा. विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज रहा. स्नेहमेळाव्याप्रसंगी कार्यकर्त्यांना आवाहन.
एकेकाळी 'लिटल रशिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरजी समुद्रकिनाऱ्यावर यंदा देशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. या बदलत्या समीकरणामुळे आणि किनाऱ्यावरील वाढत्या समस्यांमुळे स्थानिक पर्यावरणप्रेमी आणि व्यावसायिक धास्तावले आहेत.
व्यात 'धिरिओ' म्हणजेच बैलांच्या झुंजीवर न्यायालयीन बंदी असतानाही, आज २८ डिसेंबर २०२५ रोजी कोलवा येथील मोकळ्या शेतात एका भव्य बैल झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. या झुंजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून अशा कार्यक्रमांवर बंदी असूनही, कोलवा पोलिसांच्या नाकाखाली हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
2025 सालातील 'मन की बात'चा हा शेवटचा भाग मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या साखळी मतदारसंघात कार्यकर्त्यांसह आणि स्थानिक नागरिकांसह पाहिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत, पंतप्रधानांचे विचार आणि देशातील विविध यशोगाथा जाणून घेण्यासाठी नागरिकांनी हा कार्यक्रम नियमितपणे पहावा, असे आवाहन केले.
ख्रिसमसच्या उत्सवा निमित्त गोव्याच्या कानाकोपऱ्यात गोठे साकारले जात असताना, साळगाव येथील अवर लेडी ऑफ रोझरी चॅपलमध्ये एक अत्यंत कलात्मक आणि फिरत्या यंत्रणेवर आधारित ख्रिसमस क्रिब उभारण्यात आला आहे. स्थानिक कलाकार सालिस फर्नांडिस यांनी आपल्या कल्पकतेतून ही कलाकृती साकारली आहे.
दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील खोतीगाव आणि गावडोंगरी या दोन पंचायतींच्या क्षेत्रातील भूजलामध्ये धातूंचे प्रदूषण उच्च पातळीवर असल्याचे एका अलीकडील अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या भागातील विहिरी आणि कूपनलिकांच्या (Borewells) पाण्याचे नमुने तपासल्यानंतर, त्यामध्ये मानवी आरोग्यास घातक ठरतील अशा धातूंचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे.
प्राण्यांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यांच्या जगण्याच्या अधिकाराचा प्रचार करण्यासाठी गोव्याच्या राजधानीत 'गोवा ॲनिमल लिबरेशन मार्च' काढण्यात आला. 'लिबरेशन फॉर ऑल' या छत्राखाली एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी गोवेकरांना 'विगन' जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.
भारताच्या माननीय राष्ट्रपती आणि तिन्ही सैन्यदलांच्या सर्वोच्च कमांडर श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज वास्को येथील आयएनएस हंसा या नौदल तळाला भेट दिली. याप्रसंगी भारतीय नौदलाच्या तुकडीतर्फे त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.
राष्ट्रपतींच्या आगमनानंतर नौदलाच्या जवानांनी शिस्तबद्ध संचलन केले. राष्ट्रपतींनी या संचलनाची बारकाईने पाहणी केली आणि जवानांच्या शिस्तीचे कौतुक केले. या सोहळ्याला नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (GMC) विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील 'IMA MSN Awards 2025' मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. सूर्यम सिंग, दिव्या गावडे, पार्थ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण गटाने गोव्याचे प्रतिनिधित्व करताना एकूण ४ राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.
दिग्गजांच्या हस्ते गौरव: या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान 'आयएमए'चे (IMA) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला मावळते अध्यक्ष डॉ. आर. व्ही. अशोकन, मानद सरचिटणीस डॉ. शर्बरी दत्ता आणि मानद वित्त सचिव डॉ. पीयूष जैन यांसारख्या वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची उपस्थिती होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.