Goa News: बागा समुद्रकिनाऱ्यावर अवैधपणे फोटोग्राफी करणाऱ्या बिहारी तरुणांना दणका, पर्यटन खात्याने ठोठावला दंड; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Marathi Breaking News 05 February 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Goa News: बागा समुद्रकिनाऱ्यावर अवैधपणे फोटोग्राफी करणाऱ्या बिहारी तरुणांना दणका, पर्यटन खात्याने ठोठावला दंड; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Published on
Updated on

बागा समुद्रकिनाऱ्यावर अवैधपणे फोटोग्राफी करणाऱ्या बिहारी तरुणांना दणका; पर्यटन खात्याने ठोठावला दंड

बागा समुद्रकिनाऱ्यावर अवैधपणे फोटोग्राफी करणाऱ्या बिहारमधील दोन तरुणांना पर्यटक पोलिसांनी पकडल्यानंतर पर्यटन खात्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

तिळारी धरणाच्या कालव्याची दुरुस्ती, उद्यापासून सुरुळीत होणार पाणीपुरवठा

तिळारी धरणाच्या कलव्याच्या दुरुस्तीनंतर आज (5 फेब्रुवारी) दुपारी पाणी पर्वरी जलुद्धीकरण प्रकल्पात पोहोचवण्यात आले. उद्यापासून पाणीपुरवठा सुरुळीत होईल.

पिटबुल, रॉटविलरसारख्या हिंस्त्र कुत्र्यांना गावात मोकळे सोडल्यास दंडात्मक कारवाई, आसगाव पंचायतीची नोटीस

राज्य सरकारने बंदी घातलेल्या पिटबुल, रॉटविलरसारख्या हिंस्त्र कुत्र्यांना गावात मोकळे सोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी नोटीस आसगाव पंचायतीकडून काढण्यात आली आहे. हल्लीच बादे येथे रॉटविलर कुत्र्‍याने एका व्यक्तीवर हल्ला केला होता.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मायणा - कुडतरी पोलिसांनी प्लासिदो कुलासो याला अटक केली आहे.

गोवा पोलिस खात्यात 17.30 लाखांचा गैरव्यवहार; महिला पोलिस कॉन्स्टेबल निलंबित

पोलिस खात्यात १७.३० लाख रुपपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल पूजा गावसला निलंबित करण्यात आले आहे. डिचोली पोलिस स्थानकात जमा झालेल्या दंडाच्या रखमेत हा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

Goa BJP Head quarter: गोवा भाजप कार्यालयाच्या बांधकामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप गोवा कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, कोषाध्यक्ष संजीव देसाई, माजी आमदार आणि भाजप गोवा आयटी सेलचे समन्वयक सिद्धार्थ कुंकलिएंकर उपस्थित होते

Goa News: बागा समुद्रकिनाऱ्यावर अवैधपणे फोटोग्राफी करणाऱ्या बिहारी तरुणांना दणका, पर्यटन खात्याने ठोठावला दंड; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Viral Post: 'हरियाणा - दिल्लीकरांनो आता आमच्या गोव्याची वाट नका लावू'; चोडण येथे 30 व्हिला, यॉट क्लब, हेलिपॅड उभारणार?

Goa News: ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरुद्ध निदर्शने

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरुद्ध निदर्शने केली. एस्मा मागे घेण्याची आणि संप सामूहिक ट्रेड युनियन अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी केली. सर्वसामान्य कामगारांना १२ लाख उत्पन्न करमुक्त केल्याने काही फायदा होणार नाही.जीएसटी द्वारे त्यांची पिळवणूक सुरु आहे: सुहास नाईक

Goa Accident :आगाशी येथे एका अपघाताची नोंद

पणजीकडे जाणाऱ्या एका कारने अचानक उजवीकडे वळण घेत आगाशी येथे यू-टर्न घेतला आणि त्याच दिशेने जात असलेल्या एका मिनी टेम्पोलाही टक्कर टाळण्यासाठी अचानक ब्रेक लावावा लागला. परिणामी, धातूच्या चौकोनी नळ्या टेम्पोमधून बाहेर पडल्या. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Goa Crime: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक

मायना कुडतरी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी प्लासीडो कोलाको (20) याला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com