
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. चर्चेदरम्यान, केंद्र सरकारकडून राज्याला कराचा मोठा वाटा मिळावा, अशी इच्छा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली, यामुळे गोव्याचा विकास आणि प्रगती होण्यास मदत होईल.
पोलिसांनी नाईकवाडो, कळंगुट येथे टाकलेल्या छाप्यात आरोपी सचिन राठोड (२४, रा. कळंगुट; कर्नाटक) याच्याकडे ९५० ग्रॅम वजनाचा गांजा अवैधरित्या आढळून आला.
राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शॅक्समध्ये पर्यटकांना होणारी मारहण, अनियंत्रित पॅराग्लायडिंग आणि ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे गोव्यात पर्यटक असुरक्षित आहेत. पर्यटकांना सुरक्षा पुरवण्यात सावंत सरकार सपशेल अपयशी ठरले, असे म्हणत गोवा युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश नाडर यांनी हल्लाबोल केला.
ऑनलाइन पद्धतीने पैसे हस्तांतरित करण्याची विनंती करून फसवणूक करणाऱ्या फसव्या जीएसटी अधिकाऱ्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पर्वरीत गेल्या काही दिवसांपासून जुन्या वटवृक्षावरून चर्चा सुरु आहेत. काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यासंदर्भात प्रश्न केला असता त्यांनी याबद्दल बोलण्यास नकार दिला.
डिचोली नगराध्यक्षपदी विजयकुमार नाटेकर. निर्वाचन अधिकाऱ्यांनी बुधवारी पालिका मंडळाच्या बैठकीत केली अधिकृत घोषणा.
भाऊसाहेबांनी चूक केली किंवा गोव्याच्या अस्मितेची ॲलर्जी असल्याचा दावा करणे म्हणजे केवळ खोटेपणा नाही तर गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. खरी समस्या विजय सरदेसाई आणि त्यांच्या अहंकाराची आहे, त्यांच्यासारख्या व्यक्ती इतरांपेक्षा "अधिक गोवेकर" असणे या भ्रमाला खतपाणी घालतात. या भाऊसाहेबविरोधी आणि गोवाविरोधी वक्तव्याचा मी निःसंदिग्धपणे निषेध करतो : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
येल्लापूर येथील अरबेल घाटात फळे व भाजीपाला घेऊन व्यापाऱ्यांचा ट्रक उलटला. यात किमान १० लोकं ठार झाली तर अनेक लोकं जखमी झाली आहेत.
मंगळवारी (२१ जानेवारी) रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वास्कोतील उड्डाणपुलाचे लोकार्पण केले तसेच विविध कामांचीही पायाभरणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.