Goa News: पेडण्यात रवींद्र भवन उभारणार, कला मंत्री गोविंद गावडे यांची माहिती; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Marathi Breaking News 11 February 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि महत्वाच्या बातम्या
Goa News: पेडण्यात रवींद्र भवन उभारणार, कला मंत्री गोविंद गावडे यांची माहिती; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Minister Govind GawdeDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. बजरंग दलाचे भगवान रमेश रेडकर यांनी मडगाव पोलिस ठाण्यात मोहम्मद उर्फ ​​बलबत्ती या सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

Goa Culture: "कलाकारांची भूक ही कलेतून सिद्ध होते" पद्मश्री विनायक खेडेकर

श्री शांतादुर्गा कला मंच मासोर्डे रौप्य महोत्सव सोहळा सुरु. सोहळ्यानिमित आयोजित 'लोक कल महोत्सव २०२५ च्या म्हादय लोकमांड कार्यक्रम वाळपई कदंब बस सभागृहात संपन्न. यावेळी मान्यवरांचा हस्ते गोवा सरकारच्या सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त करणारे विवेक बुवा जोशी, पारंपारिक रणमाले कलाकार पाडुरंग गावकर, दामोदर जोशी(बिंबल सत्तरी) व सिताराम नाईक वेळगे यांचा सत्कार करण्यात आला.

Goa Crime: कोलवाळ कारागृहात कैद्यावर हल्ला

कोलवाळ कारागृहात कैद्यावर हल्ला. हल्लेखोर कैद्याचे नाव उघड करण्यास हल्ला झालेल्या अझीझचा नकार.

Dr. Pramod Sawant: ऊस उत्पादकांकडून संजीवनी कारखाना स्विकारणार ऊस

ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून संजीवनी साखर कारखाना ऊस स्विकारणार. केंद्र सरकारने ठरलेला दर शेतकऱ्यांना देण्यात येईल. बाकी सर्व बाबी शेतकऱ्यांनाच कराव्या लागतील - डॉ प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

Goa News: "बेरोजगार युवकाना संधी द्यावी": तुये माजी सरपंच निलेश कांदोळकर

सरकारने तुये इंडस्ट्रीज मधील कंपन्यांना चांगल्या सुविधा वातावरण निर्मिती करण्यासाठी आर्थिक बजेट मध्ये योजना आखून बेरोजगार युवकाना संधी द्यावी अशी मागणी तुये माजी सरपंच निलेश कांदोळकर यांनी केली.

Goa News: पेडण्यात रवींद्र भवन उभारणार कला मंत्री गोविंद गावडे यांची माहिती

पेडणे तालुक्यासाठी लवकरच दोन महिन्याच्या आत रवींद्र भवन उभारण्यासाठी भूमिपूजन केले जाईल. कला मंत्री गोविंद गावडे यांची माहिती.

Goa Panchayat News: पिळगाव पंचायत उपसरपंचपदी उमाकांत परब गावकर बिनविरोध

पिळगाव पंचायतीच्या उपसरपंचपदी उमाकांत परब गावकर. मंगळवारी झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड.

Goa Tourism: "जर कोणी गोंधळ निर्माण केला तर आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू" : डीजीपी गोवा

जर कोणी कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर स्ट्रीक ॲक्शन घेतली जाईल. मी पर्यटकांना विनंती करतो की त्यांनी गोव्याच्या सौंदर्याचा आनंद घ्यावा आणि गोंधळ निर्माण करू नये. जर कोणी गोंधळ निर्माण केला तर आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू.

Goa Accident:बोणबाग येथे टेंपो व कारमध्ये अपघात

बोणबाग- बेतोडा येथे रस्त्यावर वळण घेणाऱ्या टेंपोला कारची धडक. कार मधील सर्व प्रवासी यल्लम्मा येथे देव दर्शनाला जात होते. सर्वजण सुखरूप. गाडीचे मोठे नुकसान.

Truck Accident
Truck Accident Dainik Gomantak

Goa Technology: जीएमसी सुपर स्पेशालिटीमधील रुग्णांसाठी नवीन टोकन प्रणाली

सुपर स्पेशालिटी ब्लॉकमधील रांग व्यवस्थापन प्रणाली (QMS) द्वारे ओपीडीसाठी टोकन क्रमांक. ओपीडीच्या दिवशी सकाळी 8 वाजता नोडल ऑफिसरने डिझाइन केलेल्या कर्मचाऱ्यांद्वारे टोकन क्रमांक जारी केले जातील. रुग्णांची नोंदणी संबंधित ओपीडी नोंदणी काउंटरवर केली जाईल.

Goa Crime: डिचोलीतील आजाद जामा मशिदीतील दानपेटी फोडली

डिचोलीतील आजाद जामा मशिदीतील दानपेटी फोडली. चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.

Goa Crime: वाळपई पोलिसांकडून वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी स्फोटक साठवणाऱ्या एका व्यक्तीस अटक

वाळपई पोलिसांनी एका व्यक्तीला वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या बाँबसह अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com