Goa News: '100' पैकी 6 रुग्‍णच होतात व्‍यसनमुक्त!

Goa News: जनजागृती करुनही अपेक्षित परिणाम नाहीय.
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: तंबाखू व्यसनमुक्तीच्या जागृतीसाठी विविध प्रकारची उपाययोजना, उपक्रम राबवूनसुद्धा 100 रुग्णांतील फक्त 6 रुग्णच या व्यसनातून मुक्त होतात. हा प्रकार चिंताजनक असल्याची माहिती डॉ. शाहीन सय्यद यांनी दिली.

म्हापसा येथील जुन्या आझिलो रुग्णालयात उत्तर गोव्यातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी काल तंबाखूबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. जिल्हास्तरावरील तंबाखू नियंत्रण कक्ष तसेच समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

Goa News
Goa News: केपेत फळबागायती जागेत भूखंड विक्री; स्‍थानिकांचा संताप!

तसेच, या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना डॉ. सय्यद बोलत होत्या. यावेळी ‘गोवा कॅन’चे रोलंड मार्टिन्स तसेच विविध खात्यांतील अधिकारी उपस्थित होते. उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दरदिवशी सरासरी विविध प्रकारच्या व्यसनांशी निगडित 150 रुग्ण उपचारांसाठी येतात.

यातील 60 तंबाखूशी तर 40 तंबाखूच्या अप्रत्यक्ष परिणामातील असतात, अशी माहिती डॉ. सय्‍यद यांनी दिली. यातील बरेच गंभीर परिणाम झाल्यानंतर उपचारास येणारे असतात. आजाराच्‍या सुरूवातीला आल्यास योग्य उपाययोजना हाती घेणे सोयीस्कर ठरते अशी माहिती त्यांनी दिली.

Goa News
Goa River: म्हापसा नदीपात्र पुन्हा जलपर्णीने व्यापले!

9.7 टक्के लोक तंबाखूच्‍या आहारी

2016-17 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील एकूण लोकसंखेच्या 9.7 टक्के लोक तंबाखू व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. सरासरी सतराव्या वर्षापासून एखादी व्यक्ती सेवनाच्या आहारी जाते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात हा प्रकार जास्त गंभीर आहे.

तसेच राज्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल होत असतात. इथल्या मुक्त वातावरणामुळे पर्यटक कायद्याचे बंधन न बाळगता तंबाखूशी संबंधित पदार्थांचे सेवन करतात. त्याचे परिणाम इथल्या लोकांवर होतात. त्यामुळे अशा पर्यटकांवर सक्त कारवाई होणे गरजेचे असल्याचे डॉ. सय्यद म्हणाल्या.

डॉ. शाहीन सय्यद-

व्यसनमुक्तीसाठी सरकारी पातळीवरून विविध उपक्रमांसह जागृती केली जाते. उपचारांवर औषधीरुपात खर्च केला जातो. असे असूनही 100 रुग्‍णांतून केवळ 6 रुग्णच या व्यसनातून मुक्त होतात. इतर पुन्हा व्यसनाकडे वळतात. ही बाब खूपच गंभीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com