Mapusa Municipality: म्हापशात राखीव जागेत अतिक्रमण; ‘केटीसी’ जवळील झोपड्या जैसे थे!

प्रशासकीय यंत्रणा सुस्त : म्हापशात राखीव जागेत अतिक्रमण
Huts
HutsDainik Gomantak

Mapusa Municipality: म्हापसा नवीन ‘केटीसी’ बसस्थानकाच्या पाठिमागील मोकळ्या राखीव भूखंडावर असलेल्या झोपड्या मध्यंतरी पालिकेने जमीनदोस्त केल्या होत्या. मात्र, प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सुस्त झाल्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.

या भूखंडावर पुन्हा झोपड्या उभ्या राहिल्याने परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मार्च 2023 मध्ये पालिकेने स्थलांतरित लोकांची ही वस्ती पूर्णतः हटविली होती. .

Huts
Anjuna Beach: हणजूण किनारी सीआरझेडच्या अधिकाऱ्यांना रोखले, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा दावा

त्यावेळी पालिकेने आश्वासन दिले होते की, ही वस्ती पुन्हा उभी राहणार नाही याची काळजी घेऊ. मात्र, पालिकेला याचा विसर पडलेला दिसतो. सध्या भूखंड केटीसीच्या ताब्यात असून, जागा म्हापसा पालिका कार्यक्षेत्रात येते.

जवळपास 15 ते 20 झोपड्या येथे सध्या उभ्या आहेत. या मोकळ्या जागेवर रोजंदारी, मजुरी करणारे व रस्त्यावर साहित्य विकणारे वास्तव्य करतात. विविध राज्यांतील हे लोक येथे राहतात व अनेकवेळा त्यांच्या आपापसांतील भांडणांचा त्रास प्रवासीवर्ग तसेच स्थानिकांना सहन करावा लागतो

चतुर्थीनिमित्त ही जागा आम्ही केटीसीकडून काही दिवसांसाठी भाडेतत्त्वावर मागितली आहे. जेणेकरून चतुर्थी काळात वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध होईल. त्यानिमित्त जेसीबीच्या साहाय्याने या झोपड्या हटवून जागा पूवर्वत केली जाईल. तसेच यापुढे म्हापसा पोलिसांच्या साहाय्याने इथे कुठलाही उपद्रव होणार नाही, याची दक्षता घेऊ.

- प्रिया मिशाळ, नगराध्यक्ष, म्हापसा पालिका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com