Anjuna Beach: हणजूण किनारी सीआरझेडच्या अधिकाऱ्यांना रोखले, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा दावा

परतावे लागले माघारी
CRZ
CRZ Dainik Gomantak
Published on
Updated on

Anjuna Beach: हणजूण-कायसूव पंचायतीच्या प्रभाग क्र. 11 मध्ये स्थानिकांकडून उभारण्यात आलेल्या घरांची तसेच दुकानांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सीआरझेडच्या अधिकाऱ्यांना स्थानिक ग्रामस्थांनी प्रकरण न्यायालयात असल्याचे कारण पुढे करीत सर्व्हे करण्यास प्रखर विरोध केला.

यावेळी मोठा पोलिस फौजफाटा घेऊन किनारी भागात गेलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना लोकांसमोर नमते घेत मागे फिरावे लागले.

CRZ
Sangmpur Lottery Coupon: संगमपूर गणेशोत्सवाच्या सोडत कुपनसाठी भाविकांची गर्दी, अवघ्या एकवीस दिवसांत कुपन संपल्या

दरम्यान, गोवा मुक्तीच्या एक-दोन वर्षांनंतर स्थानिक मुंडकार तसेच मच्छीमार समाजाच्या लोकांनी आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने या भागात थाटलेली जुनी दुकाने तशीच घरे सीआरझेड यंत्रणा जमीनदोस्त करण्याची धमकी देत आहे.

प्रकरण न्यायालयात असताना शेवटचा निर्णय लागेपर्यंत कुठल्याही बांधकामास हात लावू देणार नसल्याचे घटनास्थळी उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com