पणजी : राज्यात सध्या कोरोना नियंत्रणात येत असला तरी शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.(Goa Covid-19: Increase in number of tourists in Goa)
त्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढील चिंताही वाढली आहे. दुसरीकडे, बऱ्याच जणांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसते.
राजकीय पक्ष विविध माध्यमांतून कार्यकर्त्यांची गर्दी करून कोरोनाचे नियम पायदळी तुडवत आहेत. पर्यटकांची संख्याही हळू हळू वाढत आहे.
बेळगाव, कोल्हापूर भागातून गोव्यात येणाऱ्या वाहनांचे चालक व त्यांचे मदतनीस यांच्या माध्यमातून कोरोना पसरण्याची धास्ती वाढली आहे.
गोवा व कर्नाटक राज्याच्या ज्या बसेस सुरू झाल्या आहेत त्यातील प्रत्येक प्रवाशाकडून निगेटिव्ह प्रमाणपत्र तपासणी अशक्यच आहे.
सरकारचे प्रयत्न
राज्यात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तसेच राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणही मोठ्या प्रमाणात होत आहे.
दिवसाला 4 ते 5 हजार कोरोना चाचण्या आणि 10 ते 12 हजार लोकांचे लसीकरण केले जात आहे. 75 ते 80 केद्रांत लसीकरण सुरू आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.