Mandrem Water Dispute मांद्रे मतदारसंघातील पाणी समस्या टप्प्याटप्प्याने सोडवली जाणार आहे. त्यासाठी तुये आयटीआय परिसरात 30 ‘एमएलडी’चा नवीन पाणी प्रकल्प दोन वर्षानंतर पूर्ण होईल, तोपर्यंत सध्या चांदेल येथील विस्तारित 30 एमएलडी पाणी प्रकल्प पूर्णत्वाला आलेला आहे.
त्यातून पाणी मांद्रे मतदारसंघाला मिळणाऱ्या पाण्यातून थोड्या प्रमाणात समस्या सुटेल. हा प्रकल्प पूर्ण झाला असून केवळ चाचणी व्हायची आहे.
चांदेल विस्तारीत पाणी प्रकल्पातून मांद्रे मतदारसंघासाठी केवळ सात एमएलडी पाण्याची आवश्यकता असून ते लउपलब्ध होईल, असा विश्वास मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केला.
मांद्रे मतदारसंघात दिवसेंदिवस पाण्याची समस्या उद्भवत आहे.ही समस्या आजकालची नाही. ती पंधरा-वीस वर्षांपासून वाढत गेलेली आहे. पाणी प्रकल्प विस्तारित करण्यासाठी किंवा प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न न झाल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे.
आमदार जीत आरोलकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून मांद्रे मतदारसंघासाठी खास ३० एमएलडी पाणी प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याचे प्राथमिक कामही सुरू झाले. दोन वर्षानंतर हा प्रकल्प पूर्ण होईल.
पाण्याची वाढण्यास संबंधित खात्यातील पाणी सोडणाऱ्यांच्या मर्जीचा कारभार कारणीभूत असतो. सामान्यांच्या हक्काचे पाणी मोठमोठ्या हॉटेल्सना परस्पर पुरवले जाते.
पाण्याचा प्रश्न प्रत्येकाला भेडसावततो. नळ उपलब्ध झाल्यामुळे विहिरींकडे दुर्लक्ष झाल्याने त्या प्रदूषित झाल्या आहेत. परिणामी पाण्याची समस्या जास्त वाढली.
- धरती नागोजी, सरपंच केरी.
गेल्या अनेक वर्षांपासून मांद्रेवासीयांना पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. निवासी तसेच व्यावसायिक क्षेत्र वाढल्याने पाणीप्रश्न आणखी बिकट झाला आहे.
तुये येथील प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होण्याला किमान दोन वर्षे लागतील. बांधकाम मंत्र्यांच्या आश्वासनानुसार ते 18 महिन्यांत सुरू व्हावे.
-नीलेश कांदोळकर, उपसरपंच तुये
पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणी
बाहेर धो धो पाऊस पडतो. तरी घरातील नळ कोरडे. ही स्थिती मांद्रे मतदारसंघातच दिसून येते. आणि ही समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खाते पाणी विभागाचा येणार आणि समस्या सुटणार याची वाट न बघता आमदार आरोलकर स्वतःच्या खिशातकोटून दिवसाला किमान दोन टँकर पाणी मांद्रे आणि हरमल भागांत पुरवत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.