Post Office : पोस्‍टल पत्रव्यवहार खूपच घटला!

तंत्रज्ञानाचा परिणाम : पोस्‍टात आता येतात फक्त औपचारिक पत्रे
post office
post officeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

धीरज हरमलकर

Panaji : पूर्वीच्‍या काळी पोस्‍टमन आला की प्रत्‍येकजण आपल्‍या नातेवाईकाचे पत्र आले का, म्‍हणून त्‍याला विचारायचा. तेव्‍हा फोन नव्‍हते, पत्राद्वारेच एकमेकांची खुशाली कळायची. पण अलीकडच्‍या काही वर्षांत ही टपाल पत्रे कमालीची कमी झाली आहेत. किंबहुना ती लुप्‍त होण्‍याच्‍या मार्गावर आहेत. मोबाईलसारखे आधुनिक तंत्रज्ञानाचा उदय आणि दळणवळणाची साधने वाढल्यामुळे या टपाल दळणवळणावर परिणाम झाला असल्‍याचे गोवा पोस्ट ऑफिस विभागाचे उपअधीक्षक संजय वाळवेकर यांनी सांगितले.

आपल्‍या देशात 90 च्या दशकापूर्वी जेव्हा घरांमध्ये टेलिफोन नव्हते तेव्‍हा बाहेरगावी असलेल्‍या आपल्‍या कुटुंबातील सदस्यांना पत्रे लिहून त्‍यांची खुशाली विचारली जायची. ही टपाल पत्रे संवादाचे एकमेव माध्यम होते. पोस्टमन हा पत्र पाठवणारा आणि स्वीकारणारा त्‍यांच्यातील दुवा होता. पण कालांतराने प्रत्येक घरात टेलिफोन आले आणि आता तर प्रत्‍येकाच्‍या हातात मोबाईल. त्‍यामुळे कधीही कुणाशीही बोलणे आणि संदेश पाठवणे ही सामान्य गोष्ट बनली. त्‍यामुळे टपाल पत्र लिहिण्याचे युग संपुष्टात आले.

याबाबत बोलताना संजय वाळवेकर म्‍हणाले की, गोव्यासह संपूर्ण भारतात अनौपचारिक टपाल पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्‍यामागील कारण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वाढता प्रभाव आणि वापर हे आहे.

टपाल पत्र वितरणाच्या प्रक्रियेबद्दल त्‍यांनी सांगितले की, सुरूवातीला पोस्ट ऑफिस टपाल काउंटरवर टपाल साहित्य आणि पोस्टल स्टॅम्प ठेवण्यासाठी वापरत. पत्रावर स्टॅम्प वापरत असत आणि टपाल बॉक्समध्ये पत्र टाकत असत. नंतर पत्रे गोळा करण्यासाठी पोस्टमन यायचा आणि ती क्षेत्रानुसार वर्गीकृत करायचा.

अजूनही काही लोक आपल्‍या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना पत्रे पाठवतात. आजकाल आम्हाला प्राप्त होणारी बहुतांश पोस्टल पत्रे औपचारिक असतात, ज्‍यामध्‍ये समन्स, नियुक्तीचे आदेश, सरकार व न्यायालयाच्या नोटिसा असतात.

- संजय वाळवेकर, गोवा पोस्ट ऑफिसचे उपाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Monsoon Rain Deficit
36 year old woman looking for husband
Viral Post
Post Office Recruitment 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com