Dudhsagar Waterfall: पर्यटकांनो लक्ष द्या! 'दूधसागर'बाबत नवीन अपडेट, या वेबसाईटवरून करा Time Slot Booking
Dudhsagar WaterfallsDainik Gomantak

Dudhsagar Waterfall: पर्यटकांनो लक्ष द्या! 'दूधसागर'बाबत नवीन अपडेट, या वेबसाईटवरून करा Time Slot Booking

Dudhsagar Waterfall Trekking Registration: आधी नोंदणी करुन शुल्क भरा मगच भेट द्या, नाहीतर दूधसागरला भेट न देताच माघारी फिरावे लागेल.
Published on

Dudhsagar Waterfall Trekking Online Registration

पणजी: गोवा कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठीच्या नियमात महत्वाचा आणि मोठा बदल करण्यात आला आहे. धबधब्यावर जाण्यासाठी आता तुम्हाला पूर्वनोंदणी करावी लागणार आहे.

नाव नोंदणी, पर्यटक संख्या आणि ठरलेले शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतच तुम्हाला धबधब्यावर ट्रेकिंगसाठी जाण्याची परवानगी दिली जाणाराय. नोंदणीसाठीच्या संकेतस्थळाचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

दूधसागरवर जाण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ (GTDC) आणि वन विभागाच्या वतीने शुल्क आकारण्यास सुरुवात केलीय. त्यानंतर नाराज गाईड आंदोलन करत आहेत. शुल्क आकारणी रद्द करण्याची मागणी केली जात असताना, GTDC ने आता धबधब्यावर जाण्यासाठी नोंदणी बंधनकारक केली आहे.

ऑनलाईन नोंदणी (Dudhsagar Trekking Online Registration)

जीटीडीसीचे चेअरमन आमदार डॉ. गणेश गावकर आणि जीएफडीसीच्या चेअरमन आमदार देविया राणे यांच्या हस्ते आज (सोमवार, १९ ऑगस्ट) दूधसागर ट्रेकिंग संकेतस्थळ लॉन्च करण्यात आले. पर्यटकांना येथे नोंदणी करुन शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. सर्व माहिती भरल्यानंतर आणि ट्रेकिंग स्लॉट बूक केल्यानंतर धबधब्यावर ट्रेकिंगसाठी जाण्याची परवानगी मिळणार आहे.

dudhsagar trekking website
dudhsagar trekking websiteDainik Gomantak
Dudhsagar Waterfall: पर्यटकांनो लक्ष द्या! 'दूधसागर'बाबत नवीन अपडेट, या वेबसाईटवरून करा Time Slot Booking
Goa Crime: 50 CCTV फूटेज तपासून फक्त कपड्यांवरुन घेतला शोध, विनयभंग प्रकरणी 5 महिन्यानंतर आरोपीला अटक

दूधसागवर ट्रेकिंगला जाण्यासाठी मोजावे लागणार 227 रुपये

दूधसागरवर ट्रेकिंगला जाण्यासाठी जीटीडीसी आणि गोवा वन खात्याने शुल्क आकारणी सुरु केलीय. ट्रेकिंगासाठी जाणाऱ्या पर्यटकांकडून गोवा पर्यटन मंडळ १७७ तर वन खाते ५० रुपये आकारणी करत आहे. असे मिळून पर्यटकांना २२७ रुपये द्यावे लागत आहेत.

दरम्यान, या शुल्क आकारणीला गाईड्सनी विरोध केला असून, ती बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच, आठ ऐवजी दहा पर्यटक सोबत घेऊन जाण्यास परवानगी देण्याची मागणी केलीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com