3F: फिश, फुटबॉल, फोक!

तृणमूलचे गोवा-बंगालसाठी समान धागे : ममता बॅनर्जींनी घेतली मच्छीमारांची भेट
TMC President Mamata Banerjee at Tea Shop (Goa)
TMC President Mamata Banerjee at Tea Shop (Goa) Dainik Gomantak

Goa: तृणमूल काँग्रेसने (TMC) गोवा आणि पश्चिम बंगालचे नाते सांगताना तीन ‘एफ’चा (3F) वारंवार उच्चार केला. फिश, फुटबॉल आणि फोक, हेच ते तीन समान धागे. गोमंतकीयांना भात-मासे, फुटबॉल आणि संगीताचे विलक्षण वेड आहे, असे सांगून पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्‍या अध्‍यक्ष ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी गोमंतकीयांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

TMC President Mamata Banerjee at Tea Shop (Goa)
पुती गावकर यांच्या आरोपांचे भाजपकडून खंडन

मासळीप्रेमाचा धागा घट्ट करण्यासाठी त्यांनी आज गोव्यातील बेती येथील मालीम जेटी येथे मासेमारी करणाऱ्या समुदायाशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी अनेक आश्‍‍वासनांची घोषणा केली. त्यांच्यासमवेत गोवा तृणमूल काँग्रेसचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष लुईझिन फालेरो, ॲड. यतीश नाईक आदी मान्यवर उपस्‍थित होते. यावेळी ममता बॅनर्जी यांनी जवळच्‍या एका हॉटेलमध्‍ये चहाचा आस्‍वादही घेतला.

TMC President Mamata Banerjee at Tea Shop (Goa)
बाबूला 'लोकलचा' उमेदवारच मडगावला पाठवणार

आश्‍‍वासनांची खैरात

ममता बॅनर्जी म्हणाल्या, की तृणमूल सत्तेवर आल्यास मच्छीमार बांधवांच्या जीवनाचे आणि उपजीविकेचे रक्षण करेल. सध्‍या मिळणारे अनुदान वाढवून ते ३० हजार ते ७५ हजार रुपये करेल. आधारभूत किंमत न देता कमाल विक्री किंमत देऊन सरकार मासे खरेदी करू शकेल. मासेमारी व्यवसायात गुंतलेल्या सर्व पुरुष आणि महिलांसाठी दरमहा ४ हजार रुपये भत्ता देण्यात येईल. मासेमारीची जाळी आणि उपकरणे खरेदी आणि दुरुस्तीसाठी सबसिडीदेखील सुरू केली जाईल. त्याचबरोबर मच्छीमार कल्याण मंडळाची स्थापना केली जाईल. गोव्याच्या मासळीवर पहिला हक्क गोमंतकीयांचा असेल. बुल ट्रॉलिंग आणि एलईडी मासेमारीवर कायमची बंदी आणण्यात येईल, असे ‍आश्‍‍वासनही त्‍यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com