भाडेकरु ठेवणाऱ्या गोमन्तकीयांसाठी अतिशय महत्वाची बातमी, Police Verification न केल्यास भरावा लागणार 10 हजार दंड

Tenant Verification Goa: दर महिन्याला १ ते १० तारखेपर्यंत भाडेकरूंची पडताळणी सक्तीची करण्यात आली आहे. या मुदतीत पोलिस स्थानकात जाऊन भाडेकरू पडताळणी अर्ज न केल्यास घर मालकांना दंड भरावा लागेल.
भाडेकरु ठेवणाऱ्या गोमन्तकीयांसाठी अतिशय महत्वाची बातमी, Police Verification न केल्यास भरावा लागणार 10 हजार दंड
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजीः राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री प्रमोद सावंत यांनी बाह्या सरसावल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसक्या आवळण्यासाठी भाडेकरू पडताळणी मोहीम अजेंड्यावर घेण्यात आली आहे. प्रत्येक घर मालकाला पोलिस ठाण्यात भाडेकरू नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसे न केल्याचे आढळून आल्यास १० हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले, यापुढे कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. दर महिन्याला १ ते १० तारखेपर्यंत भाडेकरूंची पडताळणी सक्तीची करण्यात आली आहे. या मुदतीत पोलिस स्थानकात जाऊन भाडेकरू पडताळणी अर्ज न केल्यास घर मालकांना दंड भरावा लागेल.

हल्लीच्या काळात बरेच गुन्हे घडले आहेत. त्यापैकी काही प्रकरणांचा छडा लागला. दागिने हिसकावणे, चोरी अशा प्रकारांत पकडण्यात आलेले चोरटे हे गोव्यात कुठे ना कुठे भाडेतत्त्वावर राहात होते, असे आढळून आले आहे.

अशा अपप्रवृत्तीचे लोकांना धाक बसावा, अशा हेतूने भाडेकरू पडताळणी मोहीम अजेंड्यावर घेण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत उत्तर व दक्षिण गोव्यात मिळून ४० हजारहून अधिक भाडेकरूंची पडताळणी करण्यात आली आहे.

भाडेकरु ठेवणाऱ्या गोमन्तकीयांसाठी अतिशय महत्वाची बातमी, Police Verification न केल्यास भरावा लागणार 10 हजार दंड
Goa Crime: साताऱ्यातील तरुणाने गोव्यातल्या युवतीला घातला 19 लाखांचा गंडा, पोलिसांना आवळल्या मुसक्या

मजुरांची नोंदणी सक्तीची

१) औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटदारांना त्यांच्याकडे असलेल्या मजुरांची यादी मजूर आयुक्तालयात नोंद करणे सक्तीचे केले जाईल.

२) त्यांची नोंदणी न केल्यास कंत्राटदारांची कामे बंद करण्यात येतील. पोलिस बीट पद्धत पुन्हा सक्रिय केली जाईल.

३) ड्रग्ज विक्रेते व दलाल यांच्यावर नजर ठेवण्यासाठी अंमलीपदार्थविरोधी कक्ष 3 तसेच क्राईम ब्रैंचमार्फत विशेष योजना अवलंबण्यात येत आहे.

...तर घरमालकांवर कारवाई

- राज्यात घडणाऱ्या बहुतेक गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय गुंतलेले आहे. रेल्वेने मोठ्या प्रमाणात परप्रांतीय गोव्यात येत आहेत. त्यातील काहीजण गुन्हेगारही असण्याची शक्यता असते. त्यामुळे नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

- काही परप्रांतीय गोव्यात भाडेकरू म्हणून राहतात व पासपोर्टसाठी अर्ज करतात. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरूंना त्यांना राहत्या पत्त्यावर अर्ज करण्यास ना हरकत देताना सतर्क राहण्याची गरज आहे. अन्यथा हे भाडेकरू कुठल्याही गुन्ह्यामध्ये सापडल्यास घर मालकाला कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com