वेळूस-सत्तरीत दसऱ्याला गालबोट; रवळनाथाच्या मंदिराला ठोकले टाळे

दोन गटातील वादानंतर मंदिराला टाळे, मामलेदारांचा निर्णय, दसऱ्याला गालबोट
Goa Dussehra festival :
दोन गटातील वादानंतर मंदिराला टाळे, मामलेदारांचा निर्णय, दसऱ्याला गालबोट
Goa Dussehra festival : दोन गटातील वादानंतर मंदिराला टाळे, मामलेदारांचा निर्णय, दसऱ्याला गालबोट Dainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: वाळपई पालिका क्षेत्रातील प्रभाग एकमधील व सत्तरी (Satari) तालुक्यातील प्रमुख असे गणले जाणाऱ्या वेळूस गावच्या श्री रवळनाथ प्रसन्न देवस्थानात (Ravalnath Devasthan) शुक्रवारी दसरा सणावेळी (Goa Dussehra festival) दोन गटात वादावादी झाली. या वादामुळे वाळपईचे मामलेदार दशरथ गावस यांनी मंदिराला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला. सायंकाळपर्यंत टाळे ठोकण्यासंदर्भात प्रक्रिया झाल्यानंतर पंचनामा करून गर्भकुडीचा दरवाजा व मुख्य दरवाजा सील करून कायदेशीर मंदिर बंद केले.

Goa Dussehra festival :
दोन गटातील वादानंतर मंदिराला टाळे, मामलेदारांचा निर्णय, दसऱ्याला गालबोट
हरवळे धबधबा ठरतोय ‘कर्दनकाळ’

वेळूस देवस्थानात गावकर, मडवळ, गुरव असे तीन महाजन आहेत. पैकी गुरव महाजन यांना पूजा करण्याचा अधिकार आहे. गावकर महाजनांना अन्य देवस्थानाबाबत पूर्ण अधिकार आहेत. पण, मागील काही वर्षांपासून गुरव महाजनांनी मंदिरावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर वेळूस देवस्थानचा वाद वाढला होता. दसरा सणावेळी तीन तरंगे काढली जातात. त्यात तीनही महाजनांना अधिकार देण्यात आलेला आहे. पण, आज गुरव महाजनांनी गावकर यांचीही तरंगे उचलण्याचा प्रयत्न केला व त्याचवेळी वाद सुरू झाला.गावकर यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी दसऱ्याला दुपारी तीन वाजता दसरा साजरा करण्यास लोक जमा होतात. पण यावर्षी गुरव महाजनांनी दुपारी एक वाजताच येऊन दसरा सणाची प्रक्रिया हातात घेतली व गावकर यांचेही तरंग उचलले.

Goa Dussehra festival :
दोन गटातील वादानंतर मंदिराला टाळे, मामलेदारांचा निर्णय, दसऱ्याला गालबोट
प्रादेशिक पक्ष युतीबाबत संभ्रमात; भाजप, काँग्रेसची दारं बंद झाल्याने पर्यायच्या शोधात

त्यावेळी आलेल्या गावकर महाजनांनी याला तीव्र आक्षेप घेतला. त्यावेळी जोरदार बाचाबाची झाली. यावेळी सत्तरीचे मामलेदार दशरथ गावस उपस्थित होते. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर मामलेदारांनी मंदिराला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला.

मामलेदार गावस कडाडले

वेळूस देवस्थानात गावकर महाजनांची यावर्षीच तरंगे तुम्ही का काढलीत? तुम्हाला देऊळ चालू द्यायचे नाही काय? असा प्रश्नांचा भडीमार करीत मामलेदार दशरथ गावस महाजनांनावर कडाडल्यानंतर सर्वजण स्तब्ध झाले. त्यावर गुरव महाजन भाष्य करण्यासच विसरले. मामलेदार गुरव बांधवांवर कडाडून याबाबात जाब विचारला. एरव्ही वाद दहा वर्षे असूनही गावकर यांची तरंगे उचलली नव्हती. पण, यावर्षीच त्यांची तरंगे का उचलली असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर गुरव बांधवांना देता आले नाही. शेवटी देऊळच बंद करतो, अशी कडक भूमिका मामलेदार दशरथ गावस यांनी घेतली.

मामलेदारांची शिष्टाई, पण...

मामलेदार दशरथ गावस यांनी महाजनांशी चर्चा करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पण, प्रकरण हातघाईवर गेल्यावर मात्र नाईलाजस्तव मंदिराला सील ठोकण्यात आले. तलाठी तुळशीदास मांद्रेकर यांनी टाळे ठोकण्याची प्रक्रिया केली. देऊळ बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाळपईचे पोलिस निरिक्षक हरिष गावस व अन्य पोलिस अधिकारी, हवालदार, महिला पोलिस घटनास्थळी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com