'MGP ला कोणीही संपवू शकत नाही', मनोज परबांच्या वक्तव्याचा ढवळीकरांकडून समाचार; म्हणाले, अहंकारी बनून ...

Maharashtrawadi Gomantak Party: अशी भाषा राजकारणात चालत नाही- ढवळीकर
MGP
MGP Dainik Gomantak

Maharashtrawadi Gomantak Party:

बहुजन समाजाचे नेते भाऊसाहेब बांदोडकर यांचा पक्ष आता चुकीच्या लोकांच्या हातात आहे. सुदिन ढवळीकर यांनी बहुजन समाजाला अक्षरशः गुलामगिरीत टाकले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष म्हणजे फक्त ढवळीकर कुटुंबीय आहे.

लोक आता एमजीपीचा खरा चेहरा ओळखत असून जनता त्यांना मतदान करणार नाहीत. ‘आरजी’ पक्ष सर्व ताकदीनिशी मगो आणि ढवळीकर बंधूंची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठीच वावरेल, असा इशारा ‘आरजी’चे अध्यक्ष मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.

मनोज परब यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दीपक ढवळीकर यांनी चांगलाच समाचार घेतला असून MGP ला कोणीही संपवू शकत नाही, भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा मुक्तीनंतर राज्याला विकसित करण्याची जबाबदारी पक्षाने घेतली असल्याचे सांगत परब यांची कानउघाडणी केलीय.

मनोज परब यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ढवळीकर म्हणाले, 'अशी भाषा राजकारणात चालत नाही. त्यांचा पक्ष नवीनच असून नुकतीच नोंदणीही झाली असल्याने त्यांनी चांगल्याप्रकारे काम करावे. सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. अहंकारी बनून विकास साधता येत नाही.

आम्ही समाजाच्या आणि साहजिकच गोव्याच्या विकासात योगदान द्यावे यासाठी राजकारणात उतरलो आहोत. कोणीही सोडून गेले तरी पक्ष संपत नाही. आज 60 वर्ष झाली असून पक्ष विधानसभेत आपली भूमिका यथोचितपणे मांडत आहे.

महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे अन्य कोणत्याही पक्षात विलीनीकरण होऊ शकत नाही आणि MGP कोणीही संपवू शकत नाही असा पुनरुच्चार त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

पणजी, पंचायत चलो’ अभियानाच्या बांदोडा येथील कार्यक्रमावेळी नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स'' पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याने घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यावेळी दोन्ही गटांमध्ये जबरदस्त बाचाबाची तर झालीच; पण शेवटी ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी मंत्र्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com