Mapusa Crime News: बलात्कार प्रकरणी एकाला अटक; महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने म्हापसा पोलिसांची कारवाई

गुन्हे उघडकीस आणण्याच्या बाबतीत गोवा हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य- मुख्यमंत्री
Mapusa Crime News
Mapusa Crime NewsDainik Gomantak

Mapusa Crime News गोव्यात दारू, अमली पदार्थ तस्करी यासह चोरी, घरफोडी, बलात्कार अशा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच एका अपहरणाची घटना उघडकीस आली आहे.

म्हापसा बसस्थानकामागील झोपडपट्टीत राहणाऱ्या एकाने मुंबईतील 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सैफ शेर खान (वय 27) असे या आरोपीचे नाव असून महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने म्हापसा पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे वृत्त हाती आले आहे.

Mapusa Crime News
Traces of Portuguese Culture: गोवा मुक्तीनंतरही राज्यावर 'अशाप्रकारे' आहे पोर्तुगिजांची छाप...

याप्रकरणी पोलीस कर्मचारी तुकाराम शिरोडकर आणि अक्षय पाटील यांनि महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान गुन्हे उघडकीस आणण्याच्या बाबतीत गोवा हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले होते.

राज्यात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. हे प्रमाण 98 टक्के इतके आहे. गोवा पोलिसांचे हे यश आहे. गुन्हेगारी कमी करण्याच्या अनुषंगाने विविध उपाय राबवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com