Traces of Portuguese Culture: गोवा मुक्तीनंतरही राज्यावर 'अशाप्रकारे' आहे पोर्तुगिजांची छाप...

वास्को शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची मागणीही वेळोवेळी होत आहे.
Traces of Portuguese
Traces of Portuguese Dainik Gomantak

Portuguese Culture गोवा मुक्तीनंतरही राज्यावर पोर्तुगिजांच्या खाणाखुणा जिवंत आहेत. पोर्तुगिजांची छाप पुसून ‘नवा गोवा’ घडविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बेतूल येथे केले होते. त्यानंतर राज्यभरातून काहींनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन तर काहींनी टीका केली होती.

फादर विक्टर फेर्राव यांनी या संबंधी बोलताना मुख्यमंत्री पोर्तुगीजांच्या सभ्यतेच्या मोहिमेची नक्कल करत असल्याचे विधान केले होते. तसेच ''पोर्तुगीजांच्या खुणा पुसून टाकण्याची इच्छा, वसाहतवादी शक्ती आणि ज्ञानाची प्रभावी आणि मायावी रणनीतीची नक्कल आहे.

या रणनीतीचा उपयोग, ‘मते, नैतिकता आणि बुद्धीने भगवा’ वर्ग निर्माण करण्यासाठी केला जात आहे'', असेही फादर विक्टर फेर्राव यांनी म्हटले होते.

तर गोवा सुरक्षा मंचचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या विधानाशी सहमती दर्शवत वास्को शहराचे नाव बदलण्यास सुरुवात करावी अशी मागणी केली आहे. वास्को शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची मागणीही वेळोवेळी होत आहे.

राज्यात पोर्तुगीज संस्कृती आणि खाद्यपदार्थांच्या अनेक खुणा असल्या तरी अनेक पंचायतींची नावे आजही पोर्तुगीजांशी जोडलेली आहेत. विशेषतः सांताक्रुझ, गोवा वेल्हा, सांत इस्तेव, सेंट लॉरेन्स, साव माथायस, सांत आंद्रे, सां जुजे दी आरीयल, माकाझन, आर्पोरा, मोयरा, पेन्ह द फ्रान्स, रेईश मागूश, साल्वादोर द मुंद ही सर्व नावे पोर्तुगीजशी संबंधित आहेत.

Traces of Portuguese
CM Apprenticeship Policy: सरकारी आणि खासगी क्षेत्रात अप्रेंटीसशीपची मोठी संधी, दहा हजार युवकांना मिळणार लाभ

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे वक्तव्य राजकीय स्वरूपाचे आहे. पोर्तुगीज राजेशाहीमुळे बरेच गोमंतकीय पोर्तुगीज शिकले. पोर्तुगीज वास्तूकलेची ओळख जपणाऱ्या अनेक इमारती गोव्यात आहेत.

गोवा मेडिकल कॉलेज पोर्तुगीजांच्या काळात सुरू झाले, त्यामुळे एवढा मोठा इतिहास असलेली सर्व चिन्हे पुसून टाकणे योग्य नाही असे अॅड. क्लिओफात कुतिन्हो यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com