Mahadayi Water Dispute: ‘म्हादई’ला न्याय देण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश!

Mahadayi Water Dispute: प्रदेश कॉंग्रेसची टीका : 5 वर्षात काय केले जनतेला सांगावे
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute: आपली आई म्हणून उल्लेख करणाऱ्या ‘म्हादई’ला पाच वर्षांत न्याय देण्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना अपयश आले आहे.

त्यांनी ‘म्हादई’ वाचवण्यासाठी सरकारने काय केले, हे जनतेला ठोस सांगितले आहे काय? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत तुलियो डिसोझा व सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर टीकास्र सोडले.

डिसोझा म्हणाले, राज्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा म्हादईचा विषय सुटणे आवश्‍यक आहे, पण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पाच वर्षांत ‘म्हादई’चा विषय का तडीस लावला नाही. अजूनही तो विषय प्रलंबितच आहे.

कवठणकर म्हणाले, पाच वर्षांच्या कारकिर्दीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनीच बोलायला हवे. भाजप हा केडर बेस पक्ष, विचारधारेचा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जात होते, तर आता त्यांची विचारधाराही कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.

त्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता नसल्यानेच त्यांनी दुसऱ्या पक्षातील आमदारांना आपल्याकडे घेतलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Mhadei Water Dispute
Goa Water Resources Department Officers
Goa Karnataka Water Diversion
Karnataka Supreme Court Cases
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com