CM Pramod Sawant: दिल्ली दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचं मध्यप्रदेशकडे प्रयाण, दौऱ्यामागे आहे 'हे' महत्वाचं कारण

विविध राज्यांत विधानसभा निवडणुकांची जबाबदारी
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak

CM Pramod Sawant मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आता मध्य प्रदेशला निघाले असून त्यांच्यावर तेथील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नुकताच त्यांनी दिल्लीचा दौरा केला होता. त्यानंतर लगेच ते मध्य प्रदेशला निघाले आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका भाजपने गांभीर्याने घेतल्या असून यानिमित्ताने पक्षाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री अन्य राज्यांचाही दौरा करण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत असून यात राजस्थान, छत्तीसगड मिझोराम, तेलंगणा आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असून मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे.

CM Pramod Sawant
Goa Petrol Diesel Price: दक्षिण गोवा-पणजीतील इंधनाच्या किमती उतरल्या; वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे दर

ही सत्ता टिकवण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली असून कोणत्याही स्थितीत मध्य प्रदेश पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने वेगळी रणनीती आखली आहे. मध्य प्रदेशची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान अणि अन्य दोन मंत्रीही गोव्यात आले होते. आता मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुका असल्याने त्यांची जबाबदारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

CM Pramod Sawant
Agri Bazar at Ponda: ‘ॲग्री बझार’ मधील थिएटर करार नक्की किती वर्षांचा? पार्किंगच्या जागेचा वापर थिएटरसाठी?

अन्य मंत्री, नेतेही रवाना होणार

नुकताच मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा केला होता. आता ते मध्य प्रदेशला जात आहेत. यादरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याबाबत बैठक असल्याचे सांगितले होते. अर्थात, लोकसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या अन्य राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे.

याशिवाय अन्य मंत्री आणि भाजपच्या नेत्यांनाही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या असून तेही संबंधित राज्यांमध्ये जातील, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com