
मडगाव: वीज खात्याने मडगावातील ट्रान्स्फॉर्मर बॉक्समधील एलव्ही बोर्ड, फिडर पिलर्स व सर्व्हिस पिलर्स बदलायचे असल्याने सोमवार २१ ते २५ एप्रिलपर्यत मडगावात काही ठिकाणी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत वीज खंडित होईल, असे आके येथील वीज खात्याच्या उप विभाग एकचे साहाय्यक अभियंत्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सोमवार २१ एप्रिल रोजी कामत मिलन ट्रान्स्फॉर्मरवर (सिटी स्टार हॉटेल, जनता फॅमिली रेस्टॉरंट, दिलखुष उडपी हॉटेल, आनंद तिंबलो जवळील व्ही. बी. साखरे शॉप आणि परिसर.)
मंगळवार २२ राेजी कामत मिलन जवळील पंचशील हॉटेल ट्रान्स्फॉर्मरवर (कामत बिल्डींग, हॉटेल मोहिनी जवळ, गोवा प्लायवूडस हॉटेल, सिटी गार्डन, कुरतरकर शॉपिंग सेंटर आणि परिसर.)
बुधवार २३ रोजी बाबय कॉमर्स ट्रान्स्फॉर्मरवर (फिटवेडस् क्लॉथ, बाबय कॉमर्स सेंटर आणि परिसर.)
गुरुवार २४ रोजी जुने हरि मंदिर ट्रान्स्फॉर्मरवर (मुश्ताफा बुटीक, अपोलो फार्मासी, व्हिसा प्लाझा, हरिमंदिर जवळ, डिवाईन मेडिकल सेंटर कामत कमर्शिअल जवळ, कुरतरकर शॉपिंग सेंटर जवळ, प्रेस्टीज शॉप आणि परिसर.)
शुक्रवार २५ रोजी कुरतरकर प्लाझा ट्रान्स्फॉर्मरवर (सिल्व्हर टॉवर घुमटी मंदिरजवळ, डायकिन एसी, शांतादुर्गा जनरल स्टोअर्स विशांत थिएटरजवळ आणि परिसर.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.