Reliance Jewels Sangli Miraj: सांगली-मिरज रस्त्यावरील रिलायन्स ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा टाकून टोळीने तब्बल 15 कोटी रूपये किंमतीच्या दागिन्यांची लूट केली. लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी पलायन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली. दरम्यान, सांगोला नाक्यावर वाहनांची तपासणी करताना पोलिसांना गोव्यावरून आणलेली दारू घेऊन जाणारे वाहन सापडले.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीत दरोड्याची एवढी मोठी घटना घडल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी सांगलीसह सोलापूरमध्येही नाकेबंदी केली. दरम्यान, सांगोला नाक्यावर तापसणीत पोलिसांना गोव्यातून आणलेल्या दारूसह वाहन सापडले. पण, वाहनातील आरोपींनी पोलिसांवर दारूच्या बाटल्या फेकून मारल्या व पळ काढला.
मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून आरोपी स्पप्निल कोसेकर, शहाजी गायकवाड आणि असिफ मुजावर (सर्व रा. मोहोळ) यांना ताब्यात घेतले.
तपासणी करत असताना पोलिसांना त्यांच्या वाहनात गोव्यातून आणलेल्या दारूच्या तीस बाटल्या सापडल्या. मात्र, त्यांनी बॅरिकेट तोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग केला असता त्यांनी पोलिसांवर दारूच्या बाटल्या फेकून मारल्या. मंगळवेढ्यात पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली.
दरम्यान, रविवारी सांगलीमध्ये भरदिवसा रिलायन्स ज्वेलर्समध्ये दरोडा टाकत तब्बल 15 कोटी रूपये किंमतीच्या दागिन्यांची लूट केली. दरोड्यानंतर दरोडेखोर कारमधून फरार झाले. दरोडेखोर परप्रांतीय आणि अत्यंत सराईत असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांच्या शोधासाठी सुत्रे फिरवली आणि सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर येथे नाकेबंदी केली. सांगोला येथे तपासणी नाक्यावर वरील प्रकार घडला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.