Construction of partially abandoned road by PWD, Chicalim to Dabolim Road, Goa
Construction of partially abandoned road by PWD, Chicalim to Dabolim Road, GoaPradip Naik / Dainik Gomantak

Goa: खाजगी ईमारतीसाठी सरकारच्या करोडो रुपयांच्या निधीचे नुकसान

खाजगी कामासाठी केलेली मदत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD)अंगलट येण्याची शक्यता (Goa)
Published on

चिखली ग्रामविकास समितीने (Chikamil Panchayat Samitee) आल्त दाबोळी विशाल मेगा मार्ट (Vishal Mega Mart, Dabolim) खाली बेकायदेशीररित्या इमारत बांधकाम (Illegal building construction) करणाऱ्या उद्योजकांना फायदा करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरणा बरोबर संरक्षण भिंत उभारण्याच्या कामाला आक्षेप घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ता रुंदीकरण व सौरक्षक भिंतीचे काम खाजगीरित्या इमारत बांधकाम करणाऱ्यांना फायदेशीर व्हावे. यासाठी काम येथील लोकप्रतिनिधीचे विशेष कर्तव्य अधिकार्‍याच्या उपस्थित होत होते. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंगलट येत असल्याने आल्त दाबोळी येथील रस्ता रुंदीकरण व संरक्षक भिंतीचे काम अर्धवट सोडून कामगारांनी पळ काढली. खाजगी ईमारतीसाठी काम करून सरकारचे करोडो रुपयांचे नुकसान केले असून चिखली ग्राम विकास समितीने या प्रकरणी दक्षता विभागाबरोबर इतर संबंधित विभागांना तक्रार दाखल केल्याची माहिती समितीचे सदस्य सिरील फर्नांडिस यांनी दिली आहे.

Construction of partially abandoned road by PWD
Construction of partially abandoned road by PWDPradip Naik / Dainik Gomantak

चिखली पंचायत (Chicalim Panchayat) समोरून आल्त दाबोळी (Alto Dabolim) येथे जाणाऱ्या आतील रस्त्याचे रुंदीकरण व संरक्षक भिंतीच्या कामाचे उद्घाटन पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Minister Mauvin Godinho) यांच्या हस्ते करण्यात आले होते. नंतर रस्ता रुंदीकरण व संरक्षक भिंतीच्या कामाने दुसरेच वळण घेतले. सदर रस्ता रुंदीकरणाचे निमित्त पुढे करून येथे मोठ्या प्रमाणात झाडांची बेकायदेशीररित्या कत्तल करण्यात आली. कापलेल्या झाडाच्या फांद्या रस्ता रुंदीकरण करताना मातीच्या ढिगाऱ्याखाली घालण्यात आले. यावेळी आल्त दाबोळी चिखली पंचायतीपर्यंत आतील रस्ता दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांची परवानगी नसताना बंद करण्यात आला होता. कारण वाहनचालकांना रस्ता रुंदीकरणच्या नावाखाली झाडांची कत्तल नजरेस येऊ नये म्हणून. सदर झाडाची कत्तल वनविभागाची परवानगी नसताना केली असल्याची माहिती चिखली ग्राम समितीच्या सदस्यांनी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरण व संरक्षक भिंतीचे काम एका खाजगी इमारत बांधकाम करणाऱ्या उद्योजकाला फायदेशीर ठरावे म्हणून करीत होते. याप्रकरणी चिखली ग्रामसमितीने त्वरित घटनास्थळी जाऊन बेकायदेशीर कामा विरुद्ध आवाज उठविला. यावेळी चिखली ग्राम विकास समितीचे सिरील फर्नांडिस, एडविन मास्करेनस, माजी सरपंच प्रताप म्हार्दोळकर, संजय म्हाळसेकर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Construction of partially abandoned road by PWD, Chicalim to Dabolim Road, Goa
Goa: मेघालय च्या पशुपालन मंत्र्याला निलंबित करा

सार्वजनिक बांधकाम विभागाने आल्त दाबोळी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामात गैरप्रकार केला असल्याने चिखली ग्रामविकास समिती विभागाचे सदस्य सहाय्यक अभियंता, कंत्राटदार, स्थानिक लोकप्रतिनिधीचे विशेष कर्तव्य अधिकाऱ्याविरुद्ध दक्षता विभागाबरोबर गृह विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व इतर विभागांना लेखी तक्रार दाखल केली आहे. प्राप्त माहितीनुसार रस्ता रुंदीकरणाचा कंत्राटदार गेल्या काही महिन्यापासून आजारी असून सुद्धा तेथे कोण काम करीत होता याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे असे ग्रामविकास समितीने केली आहे. चिखली पंचायत ते आल्त दाबोळी पर्यंत रस्ता रुंदीकरण यावेळी कुठल्याही संबंधित विभागाची परवानगी नसताना रस्ता बंद करणे चुकीचे असल्याने यावर सुद्धा संबंधित विभागाने कारवाई केली पाहिजे. तसेच रस्ता रुंदीकरण यावेळी बंद करण्यात आलेल्या रस्त्यावर बॅरिकेड लावून तेथे वाहतूक पोलिस होमगार्ड नेमण्यात येत होते. तेथे सुरक्षारक्षक ठेवण्यासाठी त्या लोकप्रतिनिधीच्या विशेष कर्तव्य अधिकाऱ्यांनी वास्को वाहतूक पोलिसांची परवानगी घेतली होती का? याविषयी सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे.

Construction of partially abandoned road by PWD, Chicalim to Dabolim Road, Goa
Goa: तुये येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत इन्टरनेट सेवा

चिखली ते आल्त दाभोळी आतील रस्त्याचे रुंदीकरण व संरक्षक भिंतीचे काम अर्धवट सोडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, सहाय्यक अभियंता, कंत्राटदार बेकायदेशीर काम आपल्या अंगलट येण्याच्या भीतीने पळ काढली आहे. रस्ता रुंदीकरणाचा फायदा बाजूस असलेल्या मोठ्या इमारती बांधण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी रस्ता अरुंद असल्याने हे शक्य नसल्याने अखेर रुंदीकरण केल्यानंतर चिखली पंचायतीची परवानगी नसताना गैरमार्गाने ते काम सध्या सुरू आहे. अंदाजे अडीच कोटी रुपयांचे काम चक्क खाजगी इमारत बांधकामांना फायदा व्हावा म्हणून करीत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधितावर विभागामार्फत कारवाई करणे गरजेचे असल्याची माहिती चिखली ग्रामविकास समितीचे सदस्य सिरील फर्नांडिस यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com