Former MP Narendra Savaikar: ‘ना कार्यकर्ता, ना नेता, तरीही जेता, अजब सायलेंट जनता’, विरियातो यांच्या विजयावर माजी खासदाराची फेसबुक पोस्ट!

Goa Loksabha Election Result: लोकसभा निवडणूक निकालाबाबत राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळे पडसाद उमटत आहेत.
Goa Loksabha Result 224 Former MP Narendra Savaikar posted that Congress leaders did not contribute to viriato fernandes victory
Goa Loksabha Result 224 Former MP Narendra Savaikar posted that Congress leaders did not contribute to viriato fernandes victoryDanik Gomantak

Goa Loksabha Election Result: लोकसभा निवडणूक निकालाबाबत राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. माजी खासदार नरेंद्र सावईकरांनी ‘ना कार्यकर्ता, ना नेता, तरीही जेता, अजब सायलेंट जनता’, अशी पोस्ट टाकून कॅप्टन विरियातोंच्या विजयात कॉंग्रेस नेत्यांचे योगदानच नसल्याची टिप्पणी फेसबुकवर टाकून खळबळ उडवली. याशिवाय अनेक नेटकरी, व्हाट्सॲप, एक्स, अशा अनेक माध्यमांतून निवडणूक निकालाबद्दलचा, राग, उत्साह तशाच काही संमिश्र भावना व्यक्त करताना मंगळवारी दिसले.

कोलिन कोएलो, या नेटकऱ्याने फेसबुकवरील गोवा स्पिक्स या समुहावर निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर '' आलेक्स सिक्वेरा, दिगू बाबा, संकल्प आमोणकर आणि बाकीचे कोणतेच चिन्ह दिसत नाही'' असा मजकूर या नेत्यांचा उपहास करत टाकला. डॉमनिक फर्नांडिस, याने ‘३५ हजार कोटींची लूट परत मिळवण्यासाठी विरियातोंनी आता प्रयत्न करावेत’, अशी फेसबुकवर पोस्ट टाकत लोकांच्या काय अपेक्षा आहेत, हे सांगून टाकले.

Goa Loksabha Result 224 Former MP Narendra Savaikar posted that Congress leaders did not contribute to viriato fernandes victory
Goa Loksabha Election Result: 'दक्षिणेत धर्माच्या आधारावर मतदान, पहिल्यांदाच आम्ही 2 लाखांहून अधिक मते मिळवली'- भाजप प्रदेशाध्यक्ष

‘आता ईव्हीएम पवित्र...’

‘ईव्हीएम’ पवित्र झाले, संशय घेणं बंद’ अशा आशयाची कवी रमेश घाडी यांनी पोस्ट कोकणीत फेसबुवर टाकून कॉंग्रेस उमेदवार विरियातोंच्या विजयावर टिप्पणी केली आहे. पिंको हातनी या युझरने ''शाब्बास गोवा, काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांनी धन शक्ती, एकतर्फी एजन्सी, सरकारी यंत्रणा, एकतर्फी पोलीस दल, या सर्व गोष्टी एकहाती हाणून पाडले. उत्तरेत भाजपच्या श्रीपाद नाईक यांचा हा एक ऐतिहासिक विजय आहे आणि एक नम्र व्यक्ती म्हणून ते नेहमी या विजयास पात्र आहेत, अशी समतोल टिप्पणी केलेली दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com