Loksabha Election : दोन्ही मतदारसंघांतून १६ उमेदवारी अर्ज वैध

Loksabha Election : सोमवारी (ता.२२) उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यामुळे लोकसभा निवडणूक रिंगणात कोण असणार, याचे चित्र सोमवारी सायंकाळी स्पष्ट होणार आहे.
Goa Loksabha Election
Goa Loksabha Election Dainik Gomantak

Loksabha Election :

पणजी, लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून ८ तर दक्षिण गोव्यातून ८ मिळून १६ उमेदवारांचे अर्ज आज वैध ठरले. उत्तर गोव्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहा गीते आणि दक्षिण गोव्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आश्विन चंद्रू यांनी या उमेदवारी अर्जांची छाननी केली.

सोमवारी (ता.२२) उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यामुळे लोकसभा निवडणूक रिंगणात कोण असणार, याचे चित्र सोमवारी सायंकाळी स्पष्ट होणार आहे.

उत्तर गोव्यातून डमी उमेदवार सोडले तर इतर सर्वांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. श्रीपाद नाईक यांचे चार, ॲड. रमाकांत खलप यांचे दोन उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. त्यांना आता सोमवारी एकच उमेदवारी अर्ज ठेवून उर्वरित अर्ज मागे घ्यावे लागतील. कॉंग्रेसचे डमी उमेदवार आश्विन खलप आणि भाजपचे डमी उमेदवार प्रेमेंद्र शेट यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले.

Goa Loksabha Election
Goa Politics: अनुल्‍लेखाने खलपांना इशारा; मुख्यमंत्री म्हणाले, ‘म्‍हापसा अर्बन’ची फाईल पुन्‍हा उघडू

अर्ज वैध ठरलेले उत्तरेतील उमेदवार

१. शकील शेख (अपक्ष) २. ॲड. रमाकांत खलप (कॉंग्रेस),

३. मीलन वायंगणकर (बसप) ४. थॉमस फर्नांडिस (अपक्ष),

५. तुकाराम परब (आरजी), ६. सखाराम नाईक

(अखिल भारतीय परिवार पक्ष),

७. श्रीपाद नाईक (भाजप) ८. विशाल नाईक (अपक्ष).

डमी उमेदवारांचे फेटाळले अर्ज

मडगाव दक्षिण गोव्‍यातील उमेदवारांच्‍या अर्जांची आज छाननी झाल्‍यावर आठही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्‍यात आले, तर दोन डमी उमेदवारांचे अर्ज फेटाळले गेले.

दक्षिण गोवा जिल्‍हा निवडणूक कार्यालयाकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, सध्‍या दक्षिण गोव्‍यातून भाजपच्‍या पल्‍लवी धेंपे, काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस, बसपच्‍या डॉ. श्‍वेता गावकर, ‘आरजी’चे रुबर्ट परेरा,

भ्रष्‍टाचार निर्मूलन पक्षाचे हरिश्‍चंद्र नाईक यांच्‍यासह आलेक्‍सी फर्नांडिस, दीपकुमार मापारी आणि डॉ. कालिदास वायंगणकर या तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्‍यात आले. भाजपचे डमी उमेदवार गणेश गावकर आणि काँग्रेसच्‍या डमी उमेदवार अनिता फर्नांडिस यांचे अर्ज अवैध ठरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com