लोकायुक्तांची नियुक्ती झाली, पण काम ठप्पच; 30 तक्रारी प्रलंबित, 16 एप्रिलपासून पदभार स्‍वीकारण्‍याची शक्‍यता

Goa Lokayukta Office Functioning Status: विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर सरकारने लोकायुक्तपदी नियुक्ती केली असली तरी प्रत्यक्षात आजपर्यंत लोकायुक्तांचे कामकाज सुरू झालेले नाही.
Goa Lokayukta
Goa LokayuktaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर सरकारने लोकायुक्तपदी नियुक्ती केली असली तरी प्रत्यक्षात आजपर्यंत लोकायुक्तांचे कामकाज सुरू झालेले नाही. लोकायुक्तांचे सचिव मेल्विन वाझ आज निवृत्त झाल्याने कार्यालयातील स्थिती आणखी बिकट झाली आहे. सध्या तेथे निबंधक वगळता अन्य कोणताही अधिकारी उपलब्ध नसल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.

तत्कालीन लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी गेल्या वर्षी ६ एप्रिल रोजी सेवानिवृत्ती घेतल्यापासून हे पद रिक्त होते. त्यांच्या निवृत्तीनंतर आत्तापर्यंत सुमारे ३० तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत; मात्र लोकायुक्त नसल्यामुळे त्यावर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. लोकप्रतिनिधी आणि जनसेवकांच्या गैरव्यवहारांविरोधात येणाऱ्या या तक्रारी प्रलंबितच राहिल्या आहेत.

Goa Lokayukta
Goa Crime: गिरी येथील महिलेची 2.23 लाखांची फसवणूक; साळगाव पोलिसांत गुन्हा दाखल

लोकायुक्त नियुक्तीबाबत सरकारकडून होत असलेल्या विलंबामुळे काहींनी हा विषय उच्च न्यायालयात नेला होता. तेथे सरकारने नियुक्तीचे आश्‍‍वासन देत वेळ मारून नेली.

Goa Lokayukta
Goa Weather: थंडीने पल्लवित केलेल्‍या आशा उष्‍म्‍याने मावळल्‍या! काजू, आंबा बागायतदारांची व्‍यथा; दुसरा मोहोर करपला

विधानसभा अधिवेशनात विरोधकांकडून या मुद्यावरून कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने अखेर लोकायुक्तपदी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची नियुक्ती केली. त्यांचा ७ एप्रिल रोजी राजभवनावर शपथविधीही पार पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com