स्थानिक आयटी कंपन्यांना महत्त्व द्या; गोवा टेक्नॉलॉजी असोसिएशनची मागणी

गोवा टेक्नॉलॉजी असोसिएशन (GTA) ने आपल्या सदस्यांच्या सामुदायिक बैठकीत चर्चा केलेल्या मुद्द्यांवर शुक्रवारी पॅनल चर्चा झाली.
Goa Technology Association
Goa Technology AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: स्थानिक माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांना महत्त्व देण्यात यावे, मनुष्यबळात सुधारणा करावी आणि पाच वेगवेगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून सुमारे 750 वार्षिक उत्तीर्णांना 'उद्योग तयार' करावे, जेणेकरून त्यांना राज्यातच नोकरीची ऑफर देता येईल. गोवा टेक्नॉलॉजी असोसिएशन (GTA) ने आपल्या सदस्यांच्या सामुदायिक बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा केली तसेच शुक्रवारी पॅनल चर्चा झाली. (Goa Local IT companies should be given importance: GTA)

Goa Technology Association
गेल्या 8 वर्षांपासून बेकायदेशीर खाणकाम सुरू : क्लॉड अल्वारेस

पहिली पॅनल चर्चा “डीकोडिंग गोवा टेक इंडस्ट्री” आणि दुसरी “बूस्टिंग आयटी एक्सपोर्ट” या विषयावर होती. गोव्यातील आयटी उद्योगाला केवळ राज्यातच नव्हे तर जगभरात कसे फायदा करून घेता येईल यावर चर्चा झाली.

गोव्यातील (Goa) मनुष्यबळ कसे सुधारावे आणि पाच वेगवेगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून वार्षिक उत्तीर्ण कसे करावे तसेच त्यांना "उद्योग सज्ज" बनवावे, जेणेकरून त्यांना नोकरीची (Job) ऑफर देता येईल, हा या चर्चेतून एक प्रमुख मुद्दा समोर आला. गोव्यातच तसेच, आयटी उद्योगाला कौशल्य, प्रशिक्षण आणि संसाधनांचा विकास आणि त्यांना वाढवण्यावर जास्त लक्ष दिले जावे अशी इच्छा होती.

पॅनेलच्या सदस्यांनी असेही नमूद केले की राज्य सरकारने (Goa Government) मोठ्या कंपन्यांना गोव्यात आमंत्रित केले तरीही त्यांनी त्यांचे प्राधान्यक्रम स्पष्ट ठेवले पाहिजेत आणि स्थानिक कंपन्यांना पाठिंबा दिला पाहिजे.

Goa Technology Association
बेकायदेशीररीत्या दोन पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकजण ताब्यात

त्यांना राज्य सरकारकडून काय हवे आहे. असे एका पॅनेलच्या सदस्याने विचारले असता, त्यावर ते बोलले “आम्हाला आयटी पार्क वगैरे नको आहेत. स्थानिक कंपन्यांसाठी आम्हाला खरा पाठिंबा हवा आहे,”

पॅनेलच्या सदस्यांनी त्यांचे आयटी दृष्टीकोन देखील सांगीतले तसेच ते पुढे आयटी निर्यातीसाठी वापरत असलेल्या विपणन धोरणांबद्दल आणि राज्यात वाढ, महसूल कसा निर्माण करायचा आणि रोजगार कसा निर्माण करायचा याबद्दल बोलले. पॅनेलच्या चर्चेनंतर अध्यक्ष मिलिंद अन्वेकर यांच्या हस्ते गोवा टेक्नॉलॉजी असोसिएशनमध्ये सात नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला.

त्यानंतर त्यांनी मेळाव्याला संबोधित केले आणि GTA योजनांवर प्रकाश टाकला आणि म्हणाले, “GTA ने आधीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना 2022-23 साठी IT इकोसिस्टमचा रोड मॅप सादर केला आहे. आम्हाला आशा आहे की नवीन IT मंत्री गोव्यातील IT उद्योगाला पुन्हा रुळावर आणण्यास मदत करतील.” दरम्यान जीटीएचे संस्थापक अध्यक्ष मंगिरिश सालेलकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com