Traffic Jam In Panjim: पणजीत मेगा ट्रॅफीक जॅम. मांडवी जुन्या पुलावर वाहतूक खोळंबली. शहरातील अंतर्गत भागातही वाहनांच्या लांबच लांब रांगा.
लोकसभेपूर्वी डिलीमीटेशन आयोग स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी आश्वासनानंतर एसटी समाजाचे आंदोलन तात्पुरते स्थगित. शनिवारी विधानसभेत याबाबत भाष्य करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी मिळणारी सवलत पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. दुचाकीसाठी 8-10 हजार, तीनचाकी वाहनांसाठी 8-60 हजार आणि चारचाकीसाठी 8 हजार ते 1 लाख रुपये सवलत मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.06) एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मडगावातील सर्व महाविद्यालये 12 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने जारी केले आहेत.
मार्रा-पिळर्ण येथील निम्स धिल्लन यांच्या हत्येतील संशयित जितेंद्र साहू (32, भोपाळ) आणि नीतू राहुजा (22, भोपाळ) यांना म्हापसा न्यायालयाने 10 पोलिस कोठडी सुनावली. पर्वरी पोलिसांनी या संशयितांना मुंबईतून आज सोमवारी (ता.5) दुपारी गोव्यात आणले.
Goa Budget Session 2024: राज्य सरकारने इव्हेंट आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी लावण्यात येणाऱ्या बॅनरसाठी कमी खर्च करा आणि त्याचा पायाभूत विकासाठी वापर करा असे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.
जनसेना प्रमुख जनार्दन भंडारी यांनी KTCL अध्यक्ष उल्हास तुयेकर यांना मडगाव-काणकोण-कारवार मार्गावरील बसेस बायपास रोडऐवजी जुन्या मार्गावरून वळविण्याची मागणी केली होती. ती मान्य झाली असून सदर बसेसचा मार्ग वळवण्यात आला आहे. याबाबत KTCL तर्फे आदेश काढण्यात आला असून सर्व प्रवाशांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे.
कोरगाव येथे सोनसाखळी चोरीप्रकरणी पेडणे पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना 1 फेब्रुवारीला घडली असून दोघांनी कोरगावातील एका महिलेची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. तपासाअंती पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
पिळगावमधील शेतकरी आक्रमक. लाकडी कुंपण घालून सारमानस येथे खाणीवरील रस्ता अडवला. झोपडीही उभारली. आमची शेती आम्हाला द्या. मागणीशी शेतकरी ठाम.
आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी एसटी राजकीय आरक्षणाचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी विधानसभेत पारंपरिक एसटी पोशाख परिधान केला. सुरुवातीला या पोशाखामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना सभागृहात प्रवेश नाकारला. मात्र नंतर परवानगी देण्यात आली.
वीज दारवाढीवरुन विरोधकांचा वीज मंत्र्यांना घेराव. यावर नवीन सौर ऊर्जा धोरण 8 दिवसांत लागू होणार आहे. हे धोरण सौरऊर्जा काढणीला प्रोत्साहन देईल, अशी माहिती सुदिन ढवळीकर यांनी सभागृहात दिली.
पर्वरी येथील वाहतूक कोंडीमुळे लोक मोपा ऐवजी दाबोळी विमानतळावरून उड्डाण करण्यास प्राधान्य देतात. दाबोळी विमानतळ बंद होणार नाही, असे विधान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.
गोविंद गावडे यांच्यावर सभापतींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आज अधिवेशनाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ. विरोधकांची आरोपांवर चर्चेची मागणी. विरोधक आणि मुख्यमंत्री आमनेसामने.
रणजी करंडक क्रिकेट सामन्यात तमिळनाडूचा गोव्यावर 7 विकेट राखून विजय, गोव्याचा सलग दुसरा तर पाच सामन्यातील तिसरा पराभव. तमिळनाडूचा सलग तिसरा विजय.
सभापती तवडकर आणि मंत्री गोविंद गावडेंसोबत मुख्यमंत्र्यांची आल्तिन येथील आपल्या निवासस्थानी बंद दाराआड चर्चा. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेही उपस्थित.
मार्रा-पिळर्ण येथील निम्स धिल्लन यांच्या हत्येतील संशयित जितेंद्र साहू (32, भोपाळ) आणि नीतू राहुजा (22, भोपाळ) यांना नवी मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून 47.82 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. घटनेच्या आदल्या दिवशी संशयित तरुणीशी गैरवर्तणूक केल्यामुळे ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलीस तिसऱ्या संशयिताच्या मागावर असून हे तिघेही धिल्लन यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते.
मार्रा-पिळर्ण येथील होरिझन्स आझुरा प्रकल्पमधील काही व्हिलांचे मालक असलेले निम्स ढिल्लों (77, रा. कांदोळी, मूळ-पंजाब) यांचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. याप्रकरणी वाशी-मुंबई टोलनाक्यावर नवी मुंबई क्राईम ब्रॅंच पोलिसांनी दोघां संशयितांना चारचाकी गाडीसह घेतले ताब्यात. ढिल्लों पंजाबच्या एका माजी मंत्र्यांचे नातेवाईक होते. ताब्यात घेतलेल्या कथित पुरुष व महिला संशयिताने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
मंत्री गोविंद गावडे यांनी न झालेल्या कार्यक्रमांसाठी 26 लाखांचे अनुदान देऊन आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप सभापती रमेश तवडकर यांनी केला होता. या गैरव्यवहार प्रकरणी गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.