Goa Daily News Wrap: गोव्यातील 'सनबर्न' वर बंदीची मागणी, जाणून घ्या राज्यातील दिवसभरातील घडामोडी

Goa Live Update 23 November 2023: गोव्यातील लेटेस्ट अपडेट्स घ्या जाणून...
Goa Live Update
Goa Live UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

साखळीत घरावर कोसळले झाड

साखळीत घरावर झाड कोसळून अपघात झाला आहे. यात घराचे छत, भिंती, सेप्टीक टँक आणि दुचाकीचे नुकसान झाले आहे.

शिवोलीत शॉक लागून वीज खात्याच्या लाईन हेल्परचा मृत्यू

शिवोलीत शॉक लागून वीज खात्याच्या लाईन हेल्परचा मृत्यू झाला आहे. कृष्णा पवार असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विद्युत पोलवर काम करत असताना हा अपघात झाला.

मुंडकार खटले जलदगतीने निकालात काढण्यासाठी मामलेदारांना आदेश

मुंडकार खटले जलदगतीने निकालात काढण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी मामलेदारांना आदेश जारी केले आहेत. शनिवारी मुंडकार प्रकरणे हाताळण्याचे निर्देश देण्यात आले असून, सोमवारी अहवाल सादर करावा लागणार.

'सनबर्न' गोव्यातून हद्दपार करा; हिंदू जनजागृती समिती

‘सनबर्न’ महोत्सवामुळे गोव्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लागून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. विकृतीला प्रोत्साहन देणारे आणि युवा पिढीला अमली पदार्थांच्या गर्तेत ढकलून नासवणारे ‘सनबर्न’ / ‘ईडीएम’ सारखे फेस्टिव्हल गोव्यातून कायमचे हद्दपार करावेत आणि गोव्याची सांस्कृतिक अस्मिता जपावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर गोव्याच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती सँड्रा डिसोझा यांच्याकडे केली.

बांधकाम हटवून जागा पूर्ववत करा, कुंक्कळीतील ग्लोबल इस्पात कंपनीला उप-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कुंक्कळी औद्योगिक परिसरातील बेकायदेशीर बांधकाम हटवून जागा पूर्ववत करा, असे आदेश ग्लोबल इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला उप-जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

तुळशी विवाहाच्या तयारीची लगबग

गोव्यात राज्यभरात ठिकठिकाणी तुळशी विवाहाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी बाजारपेठा सजल्या असून तुळशी वृंदावनाची सजावर, रंगरंगोटी केली जात आहे.

कुडचडेत एर्टिगा कारने 2 दुचाकींना उडवले

कुडचडे मार्केटमध्ये गुरूवारी एर्टिगा कारने दोन दुचाकींनी धडक दिली. या अपघातात दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. एर्टिगा कारच्या ड्रायव्हरने मद्य प्राशन केल्याचे समोर आले आहे. त्याने स्वतःच पोलिसांना ही माहिती दिली.

पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत नोंद केली आहे. कुडचडे पोलिस ठाण्यापासून 50 मीटर अंतरावर बुधवारी संध्याकाळी हा अपघात घडला आहे.

... अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार - शिरगावमधील नागरिकांचा इशारा

शिरगावच्या सरकारी शाळा इमारतीच्या प्रश्नावरून आज येथील विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक झाले. या कमकुवत इमारतीचे काम त्वरित हाती घ्यावे.

ही इमारत सध्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे. काम सुरू न केल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात मागे राहणार नाही, असा इशारा पालकांनी दिला आहे.

बागा येथील रेस्टॉरंटला आग 

बागा येथील व्हिक्टर बार अँड रेस्टॉरंट मध्ये आज सकाळी लागलेल्या सोफासेट, एसी, लॅपटॉप असे साहित्य जळून खाक झाले आहे. एकूण ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण आणले आहे.

Goa Live Update: IFFI 2023
Goa Live Update: IFFI 2023Dainik Gomantak

इफ्फीच्या रेड कार्पेटवर कलावंत 

गोव्यात सुरू असलेल्या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज गुरूवारी इन कॉन्व्हर्सेशन सत्रात रोड टु ऑस्कर या विषयावरील चर्चासत्रात सहभागी होणारे कलाकार रेड कार्पेटवर आले.

बागा येथीर रेस्टॉरंटला आग; 50 हजाराचे नुकसान

बागा येथील व्हिक्टर बार अँड रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत पन्नास हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. रेस्टॉरंटमधील सोफासेट, एसी, लॅपटॉप असे साहित्य या आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेत ही आग आटोक्यात आणली.

हळदोण्यातील 'त्या' महिलेची मृत्यूशी झुंज संपली...

हळदोण्यातील रामतळे येथे नगरप्रदक्षिणेवेळी पालखीच्या स्वागतासाठी पणत्या पेटवत असताना भडका होऊन जखमी झालेल्या विवाहितेचा नऊ दिवसांनी गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या ७० टक्के भाजल्या होत्या. दिक्षिता नाईक (वय ३२) असे त्यांचे नाव आहे.

Mangeshi Accident
Mangeshi Accident Dainik Gomantak

मंगेशी येथे टेम्पोच्या धडकेत वेलिंग येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू

मंगेशी येथे बुधवारी रात्री उशिरा टेंपो आणि ॲक्टीव्हा यांच्यात अपघात झाला. यात वेलींग येथील ॲक्टीव्हा चालक विराज दाबोलकर (वय ३२) याचा मृत्यू झाला आहे. ॲक्टीव्हाला धडक दिल्यानंतर हा टेंपो थेट वीज खांबावर आदळल्याने वीज खांब मोडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com