त्रिपुराविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यासाठी गोव्याचा १५ सदस्यीय संघ जाहीर. अष्टपैलू दर्शन मिसाळ कर्णधारपदी कायम. पहिला सामना ५ जानेवारीपासून आगरतळा येथे खेळला जाईल.
आयआयटी संकुलासाठी रिवण-सांगे येथील जमीन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसा प्रस्तावही सरकारकडून सादर आयआयटीला गेला असून, मंजुरीनंतर पुढील प्रक्रिया केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
रायबंदर येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी स्मार्ट सिटी मिशनच्या कंत्राटदाराविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी केलीय.
Goa Budget Session 2024: गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोवा राज्याचे 2 फेब्रुवारीपासून अर्थसंक्लपीय अधिवेशन बोलवले आहे. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता राज्यपालांच्या भाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल.
तमनार प्रकल्पाच्या हाय टेंशन विद्युत वाहिन्या नाणूस उसगाव भागातून म्हापसा या ठिकाणी नेत आहेत. त्यामुळे भागातील अनेक शेतकऱ्यांच्या बागायती नष्ट झाल्या आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांनी या भागातून जाणार नाही, असे सांगितले होते; परंतु आता आमच्या जमिनींमधून या वाहिन्या नेण्यासाठी माड, सुपारी तसेच विविध झाडांची कत्तल करण्यात येत आहे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहेत.
नवीन वर्षात गोव्याची मजा अनुभवायची आहे, तीही कमी बजेटमध्ये. त्यामुळे आयआरसीटीसी प्रवाशांना अत्यंत कमी खर्चात गोव्याला घेऊन जाईल. IRCTC ने नवीन वर्षासाठी गोवा ट्रिप 'न्यू इयर बोनान्झा इन गोवा' पॅकेज आणले आहे. यात तुम्ही तुमच्या मित्रांसह बूक करू शकता.
पॅकेजची सुरूवात कधी होणार?
हा दौरा 22 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. IRCTC ने या टूरला 'न्यू इयर बोनान्झा इन गोवा' (EGA013B) असे नाव दिले आहे. या टूरद्वारे तुम्ही गोव्यातील प्रत्येक प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकाल.
Domnic D'Souza Case: कथित धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी शिवोली पास्टर डॉम्निक डीसूझा यांना अटक केली. म्हापसा एसडीपीओ, डीवायएसपी जिवबा दळवी आणि फॉरेन्सिक टीम तपासासाठी डीसूझाच्या घरी फॉरेन्सिक टीम दाखल झालीय.
Belgaum Students Lost in Goa: बेळगावमधील एका शैक्षणिक संस्थेतील नऊ विद्यार्थी ट्रेकिंग करताना कनकुंबीच्या जंगलात रस्ता चुकले. गोवा आणि कर्नाटकच्या वन अधिकाऱ्यांनी केलेल्या आठ तासांच्या संयुक्त सर्च मोहिमेनंतर त्यांना वाचविण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावच्या एका शैक्षणिक संस्थेतील नऊ विद्यार्थी 29 डिसेंबर रोजी मोटारसायकलवरून फिरायला बाहेर पडले. कर्नाटक-गोवा सीमेवरील परवाड गावाला लागून असलेल्या घनदाट जंगलातील जावनी धबधब्याकडे त्यांनी प्रस्थान केले.
विद्यार्थी मोटारसायकलवरून तीन किलोमीटर आत जंगलात गेले. त्यानंतर मोटारसायकल झाडाखाली उभी करुन त्यांनी पायी प्रवास केला, मात्र परत येताना रस्ता चुकले.
वाळपई - ठाणे रस्त्यावर दुचाकी-कार अपघातातील दुचाकी चालक उल्हास गावकर (३२) (डोंगुर्ली ठाणे) यांचे गोमेकॉत निधन. उल्हास हा फोंडा पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल होता. कारचालकावर गुन्हा दाखल.
महाराष्ट्रातील इंधनवाहू टँकर मालकांचा सुरु झालेल्या संपाचा गोव्यावर काहीही परिणाम होणार नाही. अत्यावश्यक सेवा असल्यामुळे गोव्यात येणाऱ्या इंधनाविषयी सरकारी पातळीवर त्याविषयी निर्णय घेतलाही गेला असेल. महाराष्ट्रातून फार मोठ्या प्रमाणात इंधन गोव्यात येत नाही, असे गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष परेश जोशी यांनी 'गोमन्तक 'ला सांगितले.
Sankhalim News: गोकुळवाडी साखळी येथील मल्टिपर्पज क्रीडा प्रकल्पाच्या बाहेर रस्त्याबाजूला व्यवसाय करणारा एक हातगाडा साखळी नगरपालिकेकडून हटविण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना मोठा गोंधळ निर्माण झाला.
New Year Celebration in Goa: नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी किनारी भागात मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यावेळी नव्या वर्षाचा सूर्य उजाडेपर्यंत संगीत पार्ट्या सुरू असतात. यावर्षी विदेशी पर्यटकांची नगण्य संख्या, तर देशी पर्यटकांचा उत्साह किनारी भागात मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दिसून आला. यावेळी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. डिसेंबर महिन्यात पूर्ण वर्षाच्या तुलनेत पर्यटकांची संख्या वाढते; यामुळे आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात वाढते. या दरम्यान, हॉटेल्स तसेच खाद्यपदार्थांच्या किमतीमध्येही वाढ होते.
Bhoma Accident News: 31 डिसेंबरच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुस्लीमवाडा भोमा येथे स्कुटरची वीजखांबाला धडक बसून झालेल्या स्वयंअपघातात प्रतीम रोमन बोरा (31, मुस्लीमवाडा, मूळ-आसाम) या युवकाचा मृत्यू. वाढदिनीच काळाचा घाला. म्हार्दोळ पोलिसांनी पंचनामा केला.
Domnic D'Souza Case: धर्मांतर आणि ब्लॅक मॅजिक करणाऱ्या शिवोलीतील पास्चर डॉम्निक डिसोझाला अटक. अटक केल्यानंतर छातीत दुखत असल्याने म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल.
Valpoi Accident News: भरधाव स्कोडा गाडी गाडीची दुचाकीला धडक बसून भीषण अपघात घडल्याची घटना वेळूस वाळपई रस्त्यावर घडलीय. या अपघातात डोंगुर्ली ठाणे येथील दुचाकीस्वार उल्हास गावकर हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या अपघाताची तीव्रता एवढी होती की स्कोडा गाडी रस्ता सोडून बाहेर जात 11 केव्ही वीजेच्या खांबाला धडकली. या धडकेने तो खांब देखील मोडून पडला आहे.
Siolim: फसवणूक आणि बेकायदेशीर धर्मांतरण घडवून आणण्याच्या आरोपाखाली सडये, शिवोलीमधील बिलिव्हर्सच्या डॉम्निक डिसोझा व जोन मस्करेन्हास यांच्यावर गुन्हा नोंदवून संशयित डॉम्निक यास म्हापसा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली.
संशयितांनी फोंडा येथील 40 वर्षीय इसमाला धर्मांतरासाठी धमकावले. तसेच फिर्यादीस संशयितांनी सांगितलेला आणि प्रचारित केलेला धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवले, असेही कथित आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.
Goa Live News Update 01 January 2024: स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत मळ्यातील पिपल्स हायस्कूलजवळ मलनिस्सारण वाहिनीच्या चेंबर उभारणीचे काम असलेल्या खड्ड्यात भरधाव दुचाकी पडली. या अपघातात रायबंदर येथील युवकाचा मृत्यू झाला आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अपघात घडला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.