
पळसकट्टा मोले येथे भीषण अपघात झाला, ज्यामध्ये कर्नाटकातील हल्ल्याळ मंगलवाडा येथील सचिन बंदीगनवार याचा मृत्यू झाला. पोलिस तपास सुरु.
अडवलपाल, डिचोली येथील पारंपरिक घोडेमोडणी आणि शिमगोत्सव उत्साहात साजरा.
राय ग्रामसभेने लोकवस्ती असलेल्या भागात मोबाईल टॉवरला विरोध करण्याचा ठराव केला. ग्रामसभेने टॉवरसाठी पर्यायी जागा सुचवली. याशिवाय, ग्रामसभेने अनावश्यक स्पीड ब्रेकर काढून गावातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याचा ठरावही पारित केला. तसेच, रायमधील काही भागांना पाणथळ जागा म्हणून घोषित न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
सत्तरीतील केरी चेकपोस्टवर दोन कारमधून 300 किलो बेकायदेशीर गोमांस जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या गोमांसची किंमत साधारण दीड लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस उपअधिक्षक जिवबा दळवी आणि वाळपईचे पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकारांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरु आहे.
गोवा राज्य पोलीस प्राधिकरणाने ड्युटीवर असताना कथित गैरवर्तन केल्याबद्दल डीवायएसपी कर्पे यांच्याविरुद्धच्या तक्रारीबाबत नोटीस जारी केली आहे. बार्देश येथील तक्रारदार गाडेकर यांना 16 एप्रिल 2025 रोजी पणजी येथे प्राधिकरणासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नियोजित तारखेला पुढील कार्यवाहीसाठी खटला हाती घेतला जाईल. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ड्युटीवर असताना डीवायएसपींनी अपशब्द वापरुन गोळीबार केला.
पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा. आवश्यकता भासल्यास राज्याबाहेरही उपचार करण्याची ग्वाही.
आपत्कालीनवेळी तातडीने उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रात हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्याची आवश्यकता. 108 रुग्णवाहिका सेवा मजबूत करणार. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा. डिचोलीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन.
सेटलायट 'ओपीडी' सुरु करण्याचा विचार. 108 रुग्णवाहिका सेवा मजबूत करणार. डिचोलीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन.
ताळगाव येथील एका बांधकाम साइटवर २४ वर्षीय राजीव सहानी या मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. चौथ्या मजल्यावर विश्रांती घेत असताना, तो पंखा चालू करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला.
बोर्डे-डिचोली येथील होमकुंड उत्सव उत्साहात. शनिवारी मध्यरात्री व्रतस्थ धोंड भक्तगणांसह देवीने केले अग्नीदिव्य.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.