काही आमदारांनी पक्षांतर केल्यामुळे गोव्यातील मतदार विभागलेले नाहीत किंवा गोवा काँग्रेस कमजोर झालेली नाही. आम्ही राज्यातील नेत्यांसोबत जानेवारीत बैठक घेऊन पुढील वाटचालीचा निर्णय घेऊ असे, गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले.
मिरामार येथे दुपारी एका बॉक्समध्ये १० दिवसांची जिवंत नवजात बालिका सापडली असून पणजी पोलिसानी तिला गोमेकॉ इस्पितळात दाखल केले आहे. बालिकेच्या पालकांचा शोध पोलिस घेत आहेत.
सडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आनावरण करण्यात आले. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या हस्ते या पुतळ्याचे आनावरण पार पडले.
विठ्ठलापूर-कारापूर येथील जुन्या पुलावरून 30 वर्षीय युवकाने उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असून पुढील तपास सुरू आहे.
कासावली-मोले येथे चारचाकी कार रस्त्याच्या बाजूला गटारात कलंडली. या अपघातात कारमधील साडेचार वर्षीय अलविन (वर्णापुरी-वास्को) हा मुलगा जखमी झाला आहे. त्याला गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गोव्यात माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, सर्वानंद भगत, तुलसीदास नाईक, परेश नाईक उपस्थित होते.
भारतात कोविड-19 उप-प्रकार JN.1 ची 63 प्रकरणे आढळून आली असून या प्रकारची गोव्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांनंतर गोव्यात 34 प्रकरणे समोर आली आहेत.
गोव्यातून 34, महाराष्ट्रात 9 कर्नाटकात 8, केरळमध्ये 6, तामिळनाडूमध्ये 4 आणि तेलंगणामध्ये 2 प्रकरणे आढळून आली आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी सपत्नीक आर्चबिशप फिलीप नेरी कार्डिनल फेर्राव यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
खराब हवामानाचा परिणाम गोव्यातील काजू पिकावर झाला आहे. तसेच, गोव्याच्या किनारपट्टीला देखील धूप होण्याच्या धोका निर्माण झाला आहे.
हवामान बदलाचा परिणाम गोव्यात सहज दिसून येतोय, यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने प्राधान्य द्यावे, अन्यथा राज्याचे आर्थिक नुकसान होईल, असे मत पर्यावरणवादी अभिजित प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले आहे.
मध्य प्रदेश भाजप सरकारच्या नाताळ सणावर निर्बंध जारी करणाऱ्या परिपत्रकाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
शालेय मुलांसाठी कोणत्याही नाताळ उत्सवात भाग घेणे, ख्रिसमस ट्री सजवणे, सांताक्लॉजसारखे कपडे घालणे यासाठी सरकारची पूर्व परवानगी घेण्याचे बंधनकारक करणे आणि उल्लंघन झाल्यास कारवाईस सामोरे जाण्याचा इशारा सदर परिपत्रकात देण्यात आला आहे.
यातून बोध घेत 2024 साठी गोमंतकीयांनी सावध राहणे गरजेचे आहे, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.
मोरजी पंचायत क्षेत्रातील ओहळात परिसरातील हॉटेल व्यावसायिक आपले सांडपाणी सोडत असल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. याप्रकाराने रोगराई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यभरात आज ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला. राज्यातील विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा केला गेला. काल पर्यंत चर्चना आकर्षक रंगरंगोटी, रोषणाई सारखी जय्यत तयारी करण्यात आली होती.
अखेर रात्री 12 वाजता राज्यातील विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. राजधानी पणजीतील इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने सामूहिक प्रार्थनेत भाग घेतलेला दिसून आला.
गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 97.37
Panjim ₹ 97.37
South Goa ₹ 97.75
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 89.93
Panjim ₹ 89.93
South Goa ₹ 90.29
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.