Goa News: लाईफ गार्डकडून पाच वर्षाच्या मुलाला जीवनदान; गोव्यातील ठळक बातम्या

Marathi Breaking News 25 December 2024: बीफ ट्रेडर्स स्ट्राईक, ख्रिसमस, सनबर्न यासह गोव्यातील ठळक बातम्या
Goa News: लाईफ गार्डकडून पाच वर्षाच्या मुलाला जीवनदान; गोव्यातील ठळक बातम्या
DrowningDainik Gomantak
Published on
Updated on

रुद्रेश उत्तम म्हामल यांच्या भूगर्भ जलसंवर्धन विषय प्रकल्पाला सुवर्णपदक!

मुंबई विद्यापीठाच्या १९ व्या अविष्कार विभागीय संशोधन परिषदेत रुद्रेश उत्तम म्हामल यांच्या भूगर्भ जलसंवर्धन विषयावरील संशोधन प्रकल्पाला पहिले पारितोषिक आणि सुवर्णपदक प्राप्त. प्रशांत नाईक यांनी केले रुद्रेश म्हामल यांचे अभिनंदन.

खाणप्रश्नी डिचोलीत होणार बैठक!

खाणप्रश्नी अडवलपाल लोकांची शुक्रवारी २७ डिसेंबर रोजी डिचोलीत बैठक. डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दुपारी 3.30 वा. बैठकीचे आयोजन.

लाईफ गार्डकडून पाच वर्षाच्या मुलाला जीवनदान

बोट उलटल्यानंतर बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यात लाईफ गार्ड कॅप्टन सुजन सीताराम नागवेकर यांनी यश मिळाले आहे. त्यांनी बुडणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा जीव वाचला.

सावईवेर अनंत देवस्थानाच्या तळीत एकाला बुडून मरण

सावईवेरे अनंत देवस्थानाच्या तळीत बुडून एका युवकाचा मृत्यू. मृत युवक पंचक्रोशीतील खेडे गावचा रहिवासी असल्याची माहिती. मिळालेल्या माहितीनुसार युवक तळीत मुलांना पोहण्यास शिकवत होता. पोहताना हृदयविकाराचा झटका आला असल्याचा संशय.पुढील तपास सुरू.

लॉरी घरात घुसली, सुदैवाने जीवितहानी झाली नाही

धारबांदोडा जंक्शन पॉईंटवर एका लोडेड लॉरीने पार्क केलेल्या ट्रकला आणि त्यानंतर घराला धडक दिली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे चालक मद्यधुंद अवस्थेत होता.

मयेतील निराधारांना 'नाताळ'ची भेट..!

मयेतील निराधार ख्रिश्चन बांधवाला मिळाले घरकुल. सातेरी सेवा संघाचा उपक्रम. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत घराचे हस्तांतरण.

रेस्टॉरंटमधील अन्नात सापडला कीटक

कुडचडेमधील एका शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये दिल्या गेलेल्या अन्नामध्ये कीटक आढळून आला.

सत्तरीत गोळी लागून एक युवक ठार

पाटवळ सत्तरी येथे गोळी लागून एक युवक ठार, मयात युवकाचे नाव समत खान (२२) नाणूस वाळपई पुढील तपास सुरू.

समस्त गोवेकरांना नाताळाच्या शुभेच्छा

डिसेंबरच्या महिन्यातील आनंदाच्या सणाच्या भरपूर शुभेच्छा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com