Goa liquor Smuggling In Telangana: गोवा-तेलंगणा हवाई मद्यतस्करीचा पर्दाफाश; 98 महागड्या बाटल्या जप्त, 2 जण ताब्यात, तपास सुरू

Telangana liquor Smuggling Case: गोव्यातून हवाई मार्गाने तेलंगणात शुल्क न भरता मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा तेलंगण राज्याच्या मद्यबंदी व अबकारी विभागाच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे.
Telangana liquor Smuggling Case
Goa liquor Smuggling In TelanganaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातून हवाई मार्गाने तेलंगणात शुल्क न भरता मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा तेलंगण राज्याच्या मद्यबंदी व अबकारी विभागाच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या गोव्यातील मद्याच्या ९८ बाटल्या आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेली मोटार जप्त करण्यात आली.

याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. मंगळवारी पहाटे पहाडीशरीफ परिसरात विशेष पथकाने वाहनतपासणी मोहीम राबविली. यावेळी एका संशयित मोटारीची झडती घेतली असता त्यातून शुल्क न भरलेल्या मद्याच्या ४२ बाटल्या आढळून आल्या.

Telangana liquor Smuggling Case
Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

वाहनातील कुंटीमल्ली श्रीनिवास आणि पी. व्ही. व्ही. एस. रामकृष्णा, दोघेही इब्राहिमपट्टणम येथील रहिवासी, यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतरच्या चौकशीत इतर वाहनांमधून आणखी ५६ बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यामुळे जप्त केलेल्या मद्याच्या बाटल्यांची संख्या ९८ वर पोहोचली.

दर आठवड्याला विमानाने गोव्यात

प्राथमिक तपासात आरोपी दर आठवड्याच्या शेवटी विमानाने गोव्यात येत असल्याचे उघड झाले आहे. गोव्यातील कॅसिनोंना भेट दिल्यानंतर ते मद्याच्या बाटल्या खरेदी करून परतीच्या विमानप्रवासात तेलंगणात नेत असत. त्यानंतर हे मद्य स्थानिक किराणा दुकानांच्या ग्राहकांना तसेच खासगी समारंभ आयोजकांना बेकायदेशीररीत्या विकले जात होते.

Telangana liquor Smuggling Case
Tarun Tejpal Case: तेजपाल लैंगिक छळ प्रकरण: पीडितेच्या विधानांतील विसंगतींवर बचाव पक्षाने ठेवले बोट, सुनावणी अंतिम टप्प्यात

जप्त केलेल्या मद्याच्या बाटल्या आणि मोटार पुढील कायदेशीर कारवाईसाठी शमशाबाद अबकारी ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. या तस्करीच्या जाळ्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास अबकारी विभागाकडून सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com