Goa Liquor Seized: पोळे तपासणी नाक्यावर 5 लाखाची दारू जप्त; काणकोण अबकारी अधिकाऱ्यांची कारवाई

मासे वाहतूक करणाऱ्या कंटेनरमधून दारू तस्करीचा प्रयत्न
Goa Made Liquor Seized
Goa Made Liquor Seized Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Liquor Seized: अबकारी खात्याच्या काणकोण मधील अधिकाऱ्यांनी कारवारच्या बाजूने जाणाऱ्या वाहनातून पोळे तपासणी नाक्यावर 5 लाख 8 हजार 800 रूपयांची दारू वाहनासह जप्त केली.

वाहनचालकालाही ताब्यात घेतले आहे. मल्लिकार्जुन हिरेमठ असे त्याचे नाव आहे.

अवैधरित्या ही दारू राज्याबाहेर नेली जात होती. कर्नाटकची नोंदणी असणाऱ्या (केए ४७ ए ४४७६) क्रमांकाच्या वाहनातून ही वाहतूक सुरू होती. तथापि, पोळे तपासणी नाक्यावर ही गाडी जप्त करण्यात आली.

बुधवारी रात्री अबकारी खात्याचे काणकोणमधील निरीक्षक शंबा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Goa Made Liquor Seized
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग रूंदीकरणाचा अहवाल सादर करा; हायकोर्टाचे निर्देश

या वाहनात दारूचे वेगवेगळ्या ब्रँड्सचे २२५ बॉक्स आढळून आले. त्यामध्ये विविध ब्रँड्सची दारू होती. हा सर्व मुद्देमाल अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.

मासे वाहतूक करणाऱ्या कंटरनेरमधून ही दारू नेण्यात येत होती. कंटनरच्या पुढील बाजूस मासे वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे बर्फने भरलेल्या क्रेटस ठेवून दारूचे बॉक्सेस लपविण्यात आले होते.

वाहन पोळे तपासणी नाक्यावर पोहचल्यावर अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी वाहनाची कसोशीने तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी वाहनाचा चालकाला ताब्यात घेतले आहे.

हा चालक मूळ विजापूर कर्नाटक येथील असून त्याला दुसऱ्या एका वाहनचालकाने बाळ्ळी येथे हा कंटेनर अंकोला येथे नेण्यास सांगितले गेले होते. तेथून दुसरा वाहनचालक हा कंटेनर घेऊन पुढे जाणार होता, अशी जबानी त्याने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com