Fighter Jet Tejas: ‘अस्त्र’ची गोव्यानजीक यशस्वी चाचणी, भारतीय संरक्षण दलाची महत्वपूर्ण कामगिरी

गोव्यानजीक अवकाशात ‘तेजस’ने डागले मिसाईल
Fighter Jet Tejas
Fighter Jet TejasDainik Gomantak
Published on
Updated on

Fighter Jet Tejas संपूर्ण भारतीय बनावटीचे अत्याधुनिक लढाऊ विमान तेजस- ७ या लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टने आज (बुधवारी) ‘अस्त्र’ हे स्वदेशी, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र यशस्वीपणे डागले.

गोव्याच्या किनारपट्टीपासून सुमारे २० हजार फूट उंचीवर जीपी पायलट कॅप्टन डी. मंडल यांनी या विमानातून ''अस्त्र'' क्षेपणास्त्र सोडले. भारतीय संरक्षण दलाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

Fighter Jet Tejas
Banastarim Bridge Accident: दोन कोटी रुपये जमा करा! खंडपीठाचा मेघनाला दणका

या चाचणी प्रक्षेपणाचे निरीक्षण जीपी कॅप्टन बी. बालाजी, चाचणी संचालक आणि एडीए, एचएएल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी केले.

स्वदेशी ‘अस्त्र’ची खासियत

1.''अस्त्र'' हे अत्याधुनिक तसेच हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

2. ते अत्यंत अचूकपणे सुपरसोनिक हवाई लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी बनवले आहे.

3. ‘अस्त्र’चे यशस्वी प्रक्षेपण लढाऊ पराक्रमात लक्षणीय वाढ करेल व आयात शस्त्रांवरील अवलंबित्व कमी करेल.

4. अस्त्र हे स्वदेशी क्षेपणास्त्र असून आत्मनिर्भर भारत अभियानाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

5. ‘अस्त्र’च्या कामगिरीची पडताळणी करण्यासाठी पुढील काही महिन्यांत ते पुन्हा लॉन्च करण्याचे नियोजन आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com