गोवा मुक्तिदिनी दिव्‍यांनी घर प्रकाशमय करा!

गोवा मुक्तिदिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गोमंतकीयांना आवाहन
गोवा मुक्तिदिनी दिव्‍यांनी घर प्रकाशमय करा!

गोवा मुक्तिदिनी दिव्‍यांनी घर प्रकाशमय करा!

Dainik Gomantak

Published on
Updated on

वाळपई: गोवा राज्याला (Goa) पारतंत्र्यातून, गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी राज्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले. यावर्षी गोवा मुक्तीला साठ वर्षे (60th Goa Liberation Day) पूर्ण होत आहेत. हा आनंदाचा दिवस असणार आहे. म्हणूनच 19 डिसेंबर रोजी सत्तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरोघरी पणत्या प्रज्वलीत करून सायंकाळी दिव्यांची रोषणाईच्या माध्यमातून करावी, असे आवाहन सत्तरी तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (RSS) केले आहे.

वेळूस येथे आयोजित पत्रकार परिषदेला सत्तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह जुबेन नाईक, स्वयंसेवक तथा नगरगाव नागरिक समितीचे सदस्य शाम गावठणकर यांची उपस्थिती होती. जुबेन नाईक म्हणाले रविवारी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने सत्तरी तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी सायंकाळी 7 वा. नागरिकांनी घरोघरी दिवे प्रज्वलीत करावे. तसेच रोषणाई करून घर प्रकाशमय करावे. तसेच गावोगावी मंदिरात 7 वा. घंटानाद करावा. अन्य कार्यक्रमही आयोजित करावे, असे जुबेन नाईक म्हणाले.

<div class="paragraphs"><p>गोवा मुक्तिदिनी दिव्‍यांनी घर प्रकाशमय करा!</p></div>
पंतप्रधान मोदींच्‍या आगमनाची गोव्यात लगबग

हरमलमध्‍ये मुक्तिदिनी कार्यक्रम

गोवा मुक्ती हीरक महोत्सव समिती, हरमलतर्फे 18 रोजी सायं. 4.30 वा. श्री देवी भूमिका मंदिर, शेटकरवाडा येथे विशेष कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यानिमित्त ‘गोवा मुक्ती लढ्याचा इतिहास’ या विषयावर प्रमुख वक्ते शिवाजी यशवंतराव देसाई यांचे भाषण होईल.

<div class="paragraphs"><p>गोवा मुक्तिदिनी दिव्‍यांनी घर प्रकाशमय करा!</p></div>
गोव्यातील आजच्या खास घडामोडी

कार्यक्रमाचे आयोजन श्री भूमिका मंदिर देवस्थान समिती हरमल, भूमिका क्रीडा व सांस्कृतिक संघ, आश्‍वे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, हरमल, दुर्वांकुर कला केंद्र, हरमल, नवरात्रोत्सव मंडळ, हरमल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मंडळ मांद्रे हरमल, यांनी कळविले आहे. गावातील देवस्थान समिती पदाधिकारी, सामाजिक संस्था पदाधिकारी व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com