Leopard In Bhuipal: पिंजरा एकीकडे, हल्ला दुसरीचकडे; बिबट्या काही वनविभागाला दाद देईना..

भुईपाल येथील प्रकार : पाळीव कुत्रे व गुरांवरील हल्ले कायम
Leopard In Goa
Leopard In GoaDainik Gomantak

Leopard In Goa भुईपाल चेकपोस्ट परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने तेथे पिंजरा लावून सापळा रचला होता.

परंतु चतुर बिबट्याने त्या पिंजऱ्याकडे न जाता दुसऱ्या शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या गुरांवर हल्ला करणे सुरूच ठेवले असल्याचे प्रकरण समोर आले आहे. यावेळी बिबट्याने साक्षी दवणे यांच्या गोठ्यातील गुरांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.

यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी बिबट्याने भुईपाल चेकपोस्ट भागातील धाकटू दवणे यांच्या गोठ्यात असलेल्या वासरावर हल्ला करून त्याला ठार केले होते.

त्याचप्रमाणे काही जणांच्या पाळीव कुत्र्यांना उचलून नेले होते. त्यामुळे त्या बिबट्याची दहशत वाढली होती. हा प्रकार वन विभागाच्या नजरेस आणून देताच त्यांनी धाकटू दवणे यांच्या गोठ्याजवळ बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचून पिंजरा लावला होता.

परंतु बिबट्याने त्या पिंजऱ्याकडे पाठ फिरवून दुसरीकडे मोर्चा वळवून आपला प्रताप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे त्या परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत.

दुसरीकडे केला हल्ला

यावेळी बिबट्याने पिंजरा लावण्यात आला आहे त्या भागात न जाता, दुसऱ्या बाजूने साक्षी दवणे यांच्या गोठ्यात प्रवेश करून, त्यांच्या गुरांना गंभीर जखमी केले आहे. त्याचप्रमाणे या बिबट्याने दवणे यांचे बांधून ठेवलेले चार कुत्रे पळविल्याचे साक्षी दवणे यांचे पती मुलू दवणे यांनी सांगितले.

Leopard In Goa
अपुरी सामग्री, पंखे-दिवे गायब, डॉक्टर-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे; कुडचडे आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेवर काँग्रेस आक्रमक

उपाययोजनेची गरज

या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याला वेगळी व्यूहरचना आखावी लागणार आहे. नाही तर येणाऱ्या काळात या बिबट्याकडून आणखीन प्राणघातक हल्ले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बिबट्याला आता परिसराची सर्व माहिती झालेली असल्याने तो थांबून थांबून येथील प्राण्यांवर हल्ले करीत आहे, असे लोकांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com